डोंबिवली : ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरात उद्भवणाºया कोंडीवर केलेले नियोजन तत्काळ करा, या प्रमुख मागणीसह वाहतुकीतील अडसर दूर करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या स्थानिक नगरसेविका खुशबू चौधरी यांनी रहिवाशांसह गुरुवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. अडथळा ठरणारे ट्रान्सफॉर्मर आणि डीपी बॉक्स तत्काळ हटविण्यात यावेत, या मागणीचे पत्र अधिकाºयांना देण्यात आले. त्यावर लवकरच नियोजन करून ट्रान्सफॉर्मर आणि डीपी बॉक्स स्थलांतर केले जातील असे संबंधित अधिकाºयांनी सांगितले.
पूर्व-पश्चिमेला जोडणाºया कोपर उड्डाणपुलावरील कोंडी कमी करण्यासाठी ठाकुर्ली परिसरात केडीएमसीने नव्याने उड्डाणपूल बांधला. पण, पुलालगतच्या अरुंद रस्त्यांमुळे येथे वाहतूककोंडी होत आहे. येथील वाहतूक सुरळीत होण्यासाठी योग्य त्या नियोजनाची अंमलबजावणी करणे, त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यांमध्ये येणारे अडथळे दूर करण्यासाठी नगरसेविका चौधरी यांच्याकडून काही दिवस सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. १५ जूनपर्यंत कार्यवाही न झाल्यास १६ जूनपासून उपोषणाचा इशाराही त्यांनी केडीएमसी प्रशासन आणि वाहतूक विभागाला दिला आहे. विजेचे तीन ट्रान्सफॉर्मर आणि दोन झाडे अडथळा ठरत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.दरम्यान, उपोषणाच्या दिलेल्या इशाºयानंतर केडीएमसी प्रशासनाची कार्यवाही सुरू करण्यात आली. तीन दिवसांपूर्वी जोशी हायस्कूलसमोरचे भलेमोठे झाड तोडण्यात आले. दरम्यान, ट्रान्सफॉर्मर स्थलांतर करण्याचे काम महावितरण विभागाचे असल्याने गुरुवारी चौधरी यांनी डोंबिवली एमआयडीसी विभागातील महावितरण कार्यालयात अधिकाºयांची भेट घेऊन अडथळा ठरणारे विजेचे ट्रान्सफॉर्मरही हटवण्याची मागणी केली. याचबरोबर नेहरू मैदान प्रभागातील अन्य रस्त्यांमधील अडथळे ठरणारे ट्रान्सफॉर्मर आणि डीपी बॉक्सही स्थलांतर करण्याकडे अधिकाºयांचे लक्ष वेधण्यात आले. चौधरी यांच्यासमवेत गजानन माने, प्रमोद भागवत, विनय मणेरीकर, सुनील साठे आदी रहिवासी उपस्थित होते.वाहतूक विभागाकडून कृती कधी?ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याचे ठरविले आहे. त्यात प्रामुख्याने काही मार्ग हे एकदिशा करण्यात येणार आहेत. तर काही ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी सम-विषम ( पी१-पी२) असे बदल सुचविले आहेत.काही रस्त्यांवर वाहने पार्क करण्यास बंदी घातली जाणार आहे. जड-अवजड वाहनांना या उड्डाणपुलावरून ये-जा करण्यास बंदी घातली जाणार आहे. केडीएमसी प्रशासनाकडून झाड तोडण्याची कार्यवाही सुरू झाली असताना या वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीला वाहतूक विभागाकडून प्रारंभ झालेला नाही.