सदानंद नाईक
उल्हासनगर - व्हिटीसी मैदान समोरील दुरावस्था झालेल्या अमर जवान स्तंभाचे नुतनीकरण शिवसेना उपशहरप्रमुख व यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाले. अमर जवान स्तंभाला अभिवादन करण्यासाठी शेकडो नागरिक या ठिकाणी एकत्र येतात.
देशातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ कॅम्प नं-४ व्हिटीसी मैदाना समोरील चौकात कारगिल युद्धाच्या दुसऱ्या वर्षी सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत अमर जवान स्तंभाजी संकल्पना मांडली. याबाबत महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने अमर जवान स्तंभ उभारला. मात्र काही वर्षा पासून स्तंभाची दुरावस्था होऊन स्तंभावरील बंदूक व टोपी यांची पडझड झाली होती. अखेर शिवसेना उपशहरप्रमुख व नगरसेवक यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केल्यानंतर अमर जवान स्तंभाचे, स्वातंत्र दिनानिमित्त नुतनीकरण करण्यात आले. माजी सैनिक व नागरिकांनी अरुण अशान यांचे याबाबत कौतुक केले. संग्राम फौंडेशनचे पदाधिकारी रामेश्वर गवई यांनीही अमर जवान स्तंभाचे नुतनीकरण गरजेचे झाले होते, असे सांगून अरुण अशान व महापालिकेचे आभार व्यक्त केले.