शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

म्हसेंच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:46 AM

भिवंडी महापालिकेच्या अठरा नगरसेवकांच्याविरोधात चौकशी तसेच पालिका क्षेत्रात प्रभावीपणे कर वसुली, बेकायदा बांधकामांवर कारवाई, मेट्रो रेल्वे प्रकल्प व स्वच्छ भारत अभियान आयुक्त डॉ. योगेश म्हसे प्रभावीपणे राबवत आहेत.

भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या अठरा नगरसेवकांच्याविरोधात चौकशी तसेच पालिका क्षेत्रात प्रभावीपणे कर वसुली, बेकायदा बांधकामांवर कारवाई, मेट्रो रेल्वे प्रकल्प व स्वच्छ भारत अभियान आयुक्त डॉ. योगेश म्हसे प्रभावीपणे राबवत आहेत. मात्र आयुक्तांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे नगरसेवक, राजकीय मंडळी दुखावल्याने त्यांनी आयुक्तांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे. सामान्य नागरिकांनी मात्र नेत्यांच्या या कृतीवर संताप व्यक्त केला आहे.मागीलवर्षी डॉ. योगेश म्हसे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली त्यावेळी पालिकेच्या तिजोरीत केवळ १८ लाख होते. त्यामुळे पालिका कामगारांचे पगार थकले होते. पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना आयुक्तांनी कर वसुलीचा आढावा घेतला असता मोठे व्यावसायिक व नागरिकांनी मालमत्ता कर थकवल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी कर चुकवेगिरी करणाºयांकडून कराची वसुली सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे बहुसंख्य नगरसेवक व नेते दुखावले गेले. करवसुलीबाबत अनेकांनी हस्तक्षेप केला मात्र राजकीय दबावाला बळी न पडता आयुक्त म्हसे यांनी सुमारे ५० कोटीची करवसुली करून आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न केला.त्याचबरोबर कामचुकार व गैरहजर राहणाºया कर्मचाºयांवर बदलीचा व निलंबनाचा बडगा उगारल्याने पालिकेतील टॉपटेन नगरसेवकांचे नातेवाईक व हस्तक भरडले गेले. तसेच मेट्रो रेल्वे व शहराच्या विकास आराखड्यानुसार आयुक्तांनी रस्तारूंदीकरण मोहीम सुरू केली. त्यामुळे काही राजकीय नेते दुखावले गेले. त्यांनी हा राग मनात ठेऊन अनेकांनी आपापल्या पक्षाच्या नेत्यांकडून आयुक्तांच्या बदलीची मोहीम सुरू केली. याच दरम्यान पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार वेळेत कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यांची कागदपत्रे आयोगाने आयुक्तांमार्फत मागवली आहेत.