शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कळवा रुग्णालयातील प्रमुखांना आयुक्तांनी बजावली कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 5:59 PM

वागळे इस्टेट भागातील एका मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल येण्यापुर्वीच त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करणाºया कळवा रुग्णालय प्रशासनाचा हा प्रकार त्यांच्या आता चांगलाच अंगलट आला आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, संबधींत रुग्णालयाच्या प्रमुखांनाच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ठाणे : मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल येण्यापूर्वीच महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रशासनाकडून त्याचा मृतदेह नातेवार्इंकाच्या स्वाधीन केला होता. परंतु त्यानंतर तो मयत कोरोना पॉझीटीव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलग तिसऱ्यांदा रुग्णालय प्रशासनाकडून अशी चुक झाल्याने अखेर महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन रु ग्णालय प्रशासनाच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यावर रु ग्णालय प्रशासन प्रमुख आता काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ठाणे येथील वागळे इस्टेटमधील इंदीरानगर भागातील हनुमाननगरमधील एका ५५ वर्षीय रु ग्णाला श्वाास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. या रु ग्णाची करोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, या चाचणीचा अहवाल येण्यापुर्वीच रु ग्णालय प्रशासनाने त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता. परंतु आता त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने पालिका प्रशासनाची झोप उडाली आहे. या रु ग्णाच्या मृतदेहाचे अंत्यदर्शन आणि अंत्ययात्रेत अनेकजण सामील झाल्याचे बोलले जात असून यामुळे डोंगर टेकडीवर वसलेल्या दाटीवाटीच्या भागात करोनाचे संकट गडद झाल्याचे चित्र आहे. यापुर्वी रु ग्णालय प्रशासनाकडून अशाचप्रकारची चुक घडली होती आणि त्यामुळे लोकमान्यनगर भागात रु ग्ण वाढले होते. रु ग्णालय प्रशासनाकडून तिसऱ्यांदा आता चुक झाल्याने पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी या प्रकरणाची दखल घेत, संबधींत रुग्णालय प्रशासनाच्या प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती पालिकेने दिली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या