शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

विकासासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासनाने एकत्र यावे, एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 1:21 AM

ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते ७३ व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले.

ठाणे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्र म) मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांच्या हस्ते ७३ व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करण्यात आले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी हातात हात घालून या जिल्ह्याचा गतिमान विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षाही त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी व्यक्त केली. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या सन्मानासह गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रम सुरू असतानाच विद्युतपुरवठा खंडित होऊन एसीदेखील बंद पडल्यामुळे पालकमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.या ध्वजारोहण समारंभप्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाधिकारी यांची पत्नी सीमा नार्वेकर, जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष सुभाष पवार, माजी आमदार अनंत तरे, ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी, नागरिक यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.नियोजन भवन सभागृहात झालेल्या कार्यक्र मात बोलताना पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या वर्षीचा स्वातंत्र्य दिन हा विशेष आहे. ३७० व ३५ ए हे कलम रद्द झाल्याने देशात आनंदाचे वातावरण आहे. काश्मिरीबांधवांना मूळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे. पूरपरिस्थितीत महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या हजारो प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याबद्दलजि.प.सह महापालिकेत झेंडावंदनठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७२ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि. नेमाने, जिल्हा परिषद सदस्य तसेच सर्व खातेप्रमुख, कर्मचारीवर्ग उपस्थित होते. ठाणे महापालिका मुख्यालयात महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.आटगाव हायस्कूलमध्ये ध्वजारोहणआटगाव विभाग हायस्कूलमध्ये गुरुवारी सकाळी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. मुंबई विभाग ओएनजीसीचे देवकर अनंता शंकर यांच्या शुभहस्ते हायस्कूलमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.डी. पाटील यांनी केले. शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.गुणवंतांचा सन्मानयावेळी गुणवंतांचा सन्मानही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. २०१८ या वर्षभरात पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी प्रशंसनीय कामगिरी व कर्तव्य पार पाडल्याबद्दल त्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते धातूचे बोधचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याचप्रमाणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व राष्ट्रीय प्रज्ञा शोध राज्य आणि राष्ट्रीयस्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले. वनविभाग व सामाजिक वनीकरण ठाणे यांचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०१७’ हा महसूल विभाग ठाणे अंतर्गत व्यक्ती, शैक्षणिक संस्था आदींना देऊन गौरवण्यात आले. तसेच गुणवंत खेळाडू पुरस्कार, गुणवंत क्र ीडा मार्गदर्शक पुरस्कार, गुणवंत क्र ीडा कार्यकर्ते, संघटक यांना जिल्हा क्र ीडा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. बाराबंगला येथील निवासस्थानी सकाळीच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेIndependence Dayस्वातंत्र्य दिनthaneठाणे