ठाणे : महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेत चालक पदावर कर्तव्य बजावताना वर्षभरातील २६० दिवसांत विनाअपघात सुरक्षित सेवा देणा-या ठाणे विभागाच्या आठ आगारांतील जवळपास ३५० चालकांना येत्या प्रजासत्ताक दिनी गौरविले जाणार आहे. यंदा गतवर्षापेक्षा जवळपास ५० ने चालकांची संख्या वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे विभागातून धावणाºया एसटीचे २०१८ च्या एप्रिल आणि नोव्हेंबरदरम्यान एकूण १४३ अपघात झाले आहेत. अपघातांची ही संख्या २०१७ च्या तुलनेत दहाने घटली आहे. अपघात रोखण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात पंधरवडा आयोजित केला जातो. त्यामध्ये कर्मचाºयांना मार्गदर्शनाबरोबर त्यांची नेत्रतपासणी यासारखे उपक्रम राबवले जातात. त्यातच विनाअपघात सुरक्षित सेवा देणाºया चालकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना रोख रक्कमेचे बक्षीस तसेच बिल्ले आणि सपत्निक गौरव करून सन्मानचिन्ह दिले जाते.हा गौरव प्रजासत्ताक व स्वातंत्रदिनी केला जातो. त्याचप्रमाणे ठाणे विभागांतर्गत असलेल्या चालकांनी वर्षभरातील २६० दिवसांत सुरक्षित सेवा देणाºया ३४५ जणांना येत्या २६ जानेवारीला गौरवले जाणार आहे. यामध्ये सर्वाधिक ६२ चालक हे ठाणे आगार-२ येथील तर सर्वात कमी १८ चालक हे मुरबाड आगारातील असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.>असे आहेत ते२६० दिवसवर्षाच्या एकूण ३६५ दिवसांत चालकांना साप्ताहिक सुट्यांची संख्या ५३ दिवस, इतर रजा ४२ आणि दहा दिवस पी एच अशी १०० दिवस वगळता त्या व्यतिरिक्त राहणारे २६० दिवसांचा यात समावेश आहे. या दिवसांत कर्तव्य बजावताना विनाअपघात सुरक्षित सेवा दिली जाते ते दिवस.>पहिल्यांदात प्रांगणात प्रजासत्ताक दिनप्रजासत्ताक दिन असो या स्वातंत्र दिन किंवा कामगार दिन या दिवसात ध्वजारोहन केले जाते. हा कार्यक्रम सुरुवातीपासून राज्य परिवहन विभागाच्या ठाणे नियंत्रण विभागीय इमारतीच्या टेरेसवर होत असे; परंतु यंदा पहिल्यांदाच इमारतीच्या प्रांगणात तो साजरा केला जाणार आहे. तशी तयारीही झाली असून यासाठी विभागीय नियंत्रकांनी पुढाकार घेतला आहे.
सुरक्षित सेवा देणाऱ्या ३४५ एसटी चालकांचा प्रजासत्ताक दिनी गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:38 AM