- सुरेश लोखंडेठाणे : गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत केवळ ५० टक्के मतदान ठाण्यासह कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघांत झाले. या टक्केवारीत भरीव वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही सुरू आहे. एवढेच नव्हे तर २०१४ च्या मतदानाचा अनुभव लक्षात घेऊन यंदाच्या क्रिटिकल अर्थात संवेदनशील मतदान केंद्रांचा शोध पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी जिल्ह्णातील सहा हजार ७१५ मतदानकेंद्रांचे तज्ज्ञांद्वारे संशोधन जोरदार सुरू करण्यात आले आहे.अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदारसंघांऐवजी आता ‘क्रिटिकल’ मतदारसंघ म्हणून शोध घेतला जात आहे. यानुसार, गेल्या निवडणुकीला ठाणे जिल्ह्णाच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांत ६४२ मतदानकेंद्रे व पालघर लोकसभा मतदारसंघात १६९ मतदानकेंद्रे ‘क्रिटिकल’ म्हणून घोषितझाली होती. तत्कालीन ठाणे जिल्ह्णाच्या या तिन्ही मतदारसंघांत अवघे ५० टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. यंदा या ७० टक्के मतदान व्हावे, अशी अपेक्षा निवडणूक यंत्रणेसह जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. नागरिकांनी निर्भय वातावरणात निर्भीडपणे मतदान करावे, यासाठी प्रशासन सततच्या जनजागृतीद्वारे वातावरणनिर्मिती करत आहे. त्यात कमी मतदान झालेल्या मतदारसंघांचा शोध घेऊन त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. याप्रमाणेच सहा हजार ४८८ या मुख्य मतदारसंघांसह नव्याने निश्चित केलेल्या २२७ साहाय्यकारी मतदारसंघांच्या संशोधनातून क्रिटिकल मतदारसंघांचा शोध प्रारंभी पोलिसांकडून घेतला जात आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस यांच्यात एकमत होऊन क्रिटिकल मतदानकेंद्रांची निवड होणार आहे.>कमी मतदानाच्या कारणांची चाचपणी अपेक्षितगेल्या लोकसभा निवडणुकीला अवघे ५० टक्के मतदान झाल्यामुळे प्रशासन तीव्र नाराज आहे. या कमी मतदानाचे कारण काय असावे, याचा शोधदेखील यावेळी घेणे गरजेचे आहे.मतदारांवर दडपण असल्यामुळे की काय, ते मतदानास बाहेर पडले नाही, याचीदेखील चाचपणी होणे अपेक्षित आहे. त्यावेळी जिल्ह्णातील भिवंडी ग्रामीण (६६.२३ टक्के), शहापूर (६५.७८ टक्के) आणि मुरबाड ( ६३.३३ टक्के) या तीन विधानसभांमध्येच जास्त मतदान झाले.एवढेच नव्हे तर कमी मतदान म्हणजे ४० ते ४५ टककयांपेक्षा कमी मतदान झालेल्यांमध्ये उल्हासनगर (३८ टक्के), अंबरनाथ (३९ टक्के), भिवंडी ईस्ट (४४ टक्के), डोंबिवली (४४ टक्के), कल्याण (४४ टक्के) या विधानसभांचा समावेश आहे. तर, ४५ ते ५० टक्के मतदान झालेल्यांमध्ये कल्याण ईस्ट (४५.२३ टक्के) कल्याण ग्रामीण (४७.९६ टक्के), कळवा-मुंब्रा (४७ टक्के), भिवंडी (४९.५७ टक्के), बेलापूर (४९.७९ टक्के), ओवळा-माजिवडा (५० टक्के) तर ऐरोली, ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, मीरा-भार्इंदर, आदी विधानसभा मतदारसंघांत ५१ ते ५६ टककयांदरम्यान मतदान झालेले आढळून आले आहे.७० ते ७५ टक्के मतदान एकाही विधानसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेले नसल्यामुळे तीव्र नाराजी आहे.
शोध ‘क्रिटिकल’ मतदान केंद्रांचा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 12:47 AM