ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ५३ प्रभाग (गट) घोषीत करण्यात आले आहेत. यापैकी सर्व प्रवर्गातील महिलांसाठी २७ जागा राखीव ठेवल्या आहेत. तर उर्वरित २६ जागा सर्व प्रवर्गांकरीता आगामी निवडणुकीसाठी जाहीर केल्या आहेत. येथील जिल्हा नियोजन भवनात ठाणे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्व प्रवर्गातील स्त्री-पुरूषांसाठीच्या राखीव जागांचे आरक्षण लॉटरी पद्धतीने चिठ्ठी काढून घोषीत करण्यात आले.अनुसूचित जाती (एससी.), अनुसूचित जमाती (एसटी.) , नागरिकांच्या मागासप्रवर्ग आणि सर्व गटात महिलांसाठीच्या राखीव जागांचे आरक्षण लॉटरी सोडतव्दारे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. यावेळी प्रथम ५३ प्रभागापैकी खुल्या प्रवर्गाचे २३ गट निश्चित करून त्यापैकी ११ गट खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. अनुसुचित जातीच्या (एससी) प्रवर्गासाठी तीन गट राखीव ठेवले असता त्यातील दोन गट एससी महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी १३ जागा राखीव ठेवण्यात आल्या. त्यातील सात जागा एसटी महिलांसाठी राखीव आहेत. तसेच इतर मागास प्रवर्गासाठी १४ जागा असून त्यातील सात या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत. या २७ जागा सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवल्या आहेत.शाळकरी मुलांच्या हस्ते चिठ्ठीच्या सहाय्याने सोडत काढण्यात आली. एससी प्रवर्गातील महिलांसाठी कल्याण तालुक्यातील म्हारळ आणि कांबा गट राखीव आहेत. तर वासिंद ( ता. शहापूर) हा गट एससी प्रवर्गासाठी राखीव ठेवला आहे. याप्रमाणेच एसटी प्रवर्गासाठी मोखावणे, साकडबाव,आवाळे, डोळखांब ता. शहापूर), मोहंडूळ, खारबाव ( ता. भिवंडी)आणि वैशाखरे ( ता. मुरबाड ) हे गट एसटी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर सांबे, गणेशपुरी (ता. भिवंडी), शिरोळ, बिरवाडी(ता. शहापूर), माळ, शिरवली ( ता. मुरबाड) हे सहा गट एसटी प्रवर्गासाठी आहेत.किन्हवली (शहापूर), देवगाव (मुरबाड), घोटसई, मांजर्ली (कल्याण), लोनाड, खोणी, (भिवंडी), चरगाव ( अंबरनाथ) हे प्रभाग नागरिकांचा मागासप्रवर्गातील महिलांकरीता राखीव आहेत. तर मळेगाव (शहापूर), आंबाडी, महापोली, शेलार, कारिवली, काल्हेर, पूर्णा (भिवंडी) ही नागरिकांच्या मागासवर्ग पुरुष प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.खुला गटातील महिलांसाठी गोठेघर, नडगाव ( शहापूर), सरळगाव (मुरबाड), खडवली (कल्याण), बोरीवलीतर्फे राहुर, पडघा, कवाड खु., राहनाळ, रांजनोळी (भिवंडी), वाडी, वांगणी (अंबरनाथ) हे प्रभाग राखीव आहेत. तर आसनगाव, चेरपोली, सोगाव ( शहापूर), उडवली, डोंगरन्हावे (मुरबाड), खोणी (कल्याण), दाभाड, काटई, अंजूर, कोन (भिवंडी), नेवाळी (अंबरनाथ) हे सर्वांसाठी खुले प्रभाग म्हणून घोषीत केले आहेत.
जि.प.च्या निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर , महिलांसाठी २७ जागा राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 1:59 AM