मीरा रोडमधील फेरीवाल्यांच्या कारवाईवर रहिवाशी समाधानी तर मनसे व काँग्रेसचे राजकारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 08:43 PM2021-06-30T20:43:18+5:302021-06-30T20:51:51+5:30

Mira Road News : पालिकेच्या कारवाई चे रहिवाशांनी स्वागत केले असताना दुसरीकडे मनसे व काँग्रेसने मात्र राजकारण सुरू करत फेरीवाल्याचे समर्थन केले आहे. 

Residents are satisfied with the action of peddlers in Mira Road, while MNS and Congress politics | मीरा रोडमधील फेरीवाल्यांच्या कारवाईवर रहिवाशी समाधानी तर मनसे व काँग्रेसचे राजकारण 

मीरा रोडमधील फेरीवाल्यांच्या कारवाईवर रहिवाशी समाधानी तर मनसे व काँग्रेसचे राजकारण 

Next

मीरा रोड - मीरा रोडच्या नयानगर भागातील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या जाचामुळे त्रासलेल्या रहिवाशांनी सातत्याने महापालिकेपासून शासनापर्यंत तक्रारी केल्यानंतर महापालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई केली. पालिकेच्या कारवाई चे रहिवाशांनी स्वागत केले असताना दुसरीकडे मनसेकाँग्रेसने मात्र राजकारण सुरू करत फेरीवाल्याचे समर्थन केले आहे. 

नयानगर मधील बाणेगर शाळा गल्लीतील फेरीवाल्यांना बसवण्यात काही वसुली करणाऱ्या गुंडप्रवृत्तीचा सहभाग आहे. याठिकाणी दोन शाळा असून फेरीवाल्यांच्या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे या भागातील रहिवाशी त्रासले आहेत. या फेरीवाल्यांना हातगाड्या सुद्धा भाड्याने देणारे आहेत. पालिका व पोलिसात तक्रार करणाऱ्याचे नाव या फेरीवाल्यांना बसवणाऱ्याकडे पोहचायचे. मग तक्रारदाराच्या घरी जाऊन शिवीगाळ, धमक्या दिल्याचे प्रकार होतात असे एका राहिवाशाने सांगितले. 

कोरोना संसर्ग काळात पालिकेने फेरीवाल्यांना मैदानात जागा दिली तरी देखील याच गल्लीत फेरीवाले हातगाड्या लावून व्यवसाय करतात.  हे फेरीवाले मास्क लावत नाहीत, गर्दी जमवतात आदी नियमांचे पालन करत नाहीत. त्यांच्यामुळे होणारी गर्दी, रहदारी व वाहतुकीला होणारा अडथळा आणि त्यात या फेरीवाल्यांचा मुजोरपणा यामुळे रहिवाशी मेटाकुटीला आले असून सतत तक्रारी करत असतात. 

नुकतेच महापालिकेमार्फत येथील फेरीवाल्यांवर कारवाई करताना एक फेरीवाला हातगाडी सोडत नसल्याने त्याची हात गाडी काढून घेत ती तोडण्याची कार्यवाही महापालिकेने केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.  त्यावरून युवक काँग्रेस आणि मनसेने आपले राजकारण तापवायला सुरुवात केली आहे. काँग्रेसने पालिका आणि सत्ताधारी भाजपाला टार्गेट केले आहे तर मनसेने त्या फेरीवाल्याला नवीन हातगाडी दिली आहे. 

बेकायदेशीर फेरीवाल्यांना मनसे व काँग्रेस पाठीशी घालत असल्याबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.  वास्तविक गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये देखील महापालिकेने या भागातील बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या हात गाड्या जेसीबीने तोडून टाकल्या होत्या. परंतु त्यावेळी मात्र मनसे व काँग्रेस चिडीचुप होते. त्यामुळे केवळ राजकीय स्टंटबाजी साठी आता हा खटाटोप केला जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. मनसे आणि युवक काँग्रेसला या बेकायदेशीर फेरीवाल्यांचा खरंच इतका कळवळा असेल तर स्वतःच्या घरा जवळ या फेरीवाल्यांना नेऊन हातगाड्या लावून द्या आणि दरमहा त्यांना किराणा समान द्या असा टोला नागरिकांनी  लगावला आहे. 

 

Web Title: Residents are satisfied with the action of peddlers in Mira Road, while MNS and Congress politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.