शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

फेरीवाल्यांवर कारवाई केल्याने बाणेगर गल्लीतील रहिवाशांनी मानले पालिकेचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 5:57 PM

Miraroad News : बाणेगर गल्लीतील फेरीवाले आणि त्यांच्यामागचे माफियामुळे स्थानिक रहिवासी त्रासले होते. त्यांची दहशत व गुंडगिरी मुळे लोक भयभीत होते.

मीरारोड - मीरारोडच्या नया नगरमधील बाणेगर गल्लीतील फेरीवाल्यांवर कारवाई केल्याने स्थानिक रहिवाशांनी महापालिका आयुक्त व उपायुक्त यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत आभार मानले. विशेष म्हणजे मनसे आणि काँग्रेसने मात्र फेरीवाल्याची बाजू घेत कारवाई वर टीकेची झोड उठवली होती. रहिवाशांनी मात्र कारवाईचे समर्थन करत या दोन्ही पक्षांच्या विरोधाची हवा काढून टाकली आहे. 

बाणेगर गल्लीतील फेरीवाले आणि त्यांच्यामागचे माफियामुळे स्थानिक रहिवासी त्रासले होते. त्यांची दहशत व गुंडगिरी मुळे लोक भयभीत होते. तक्रारदाराचे नाव कळताच त्यांच्या घरी माफिया पोहचत होते. कोरोना नियमांचे सुद्धा सर्रास उल्लंघन केले जात होते. त्यांनी थेट शासनापर्यंत तक्रारी चालवल्या होत्या. 

पालिकेने येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून बेकायदेशीर हातगाड्या तोडून टाकल्या. त्यावेळचा एक व्हिडिओ व्हायरल होऊन मनसेकाँग्रेसने फेरीवाल्याचा कळवळा व्यक्त करत पालिकेच्या करवाईवर टीका केली. मनसे नेत्यांनी तर फेरीवल्याला हातगाडी भेट दिली. परंतु मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या तक्रारी केल्याचे समोर आले.

एका पदाधिकाऱ्याने तर फेरीवाले पालिकेचे जावई आहेत का? असा सवाल केला होता. त्यावरून नालासोपारा येथून येणाऱ्या त्या अमराठी फेरीवल्यास नवीन हातगाडी दिल्याने फेरीवाला मनसेचा जावई आहे का? असा सवाल लोक करू लागले आहेत. दरम्यान शुक्रवारी बाणेगर गल्लीतील रहिवाशांनी महापालिका आयुक्त दिलीप ढोले, उपायुक्त अजित मुठे यांची भेट घेऊन फेरीवाल्यांवर कारवाई केल्याबद्दल पुष्पगुच्छ देत आभार मानले. 

बाणेगर गल्लीतील रहिवाशांच्या तसेच विविध राजकिय पक्षांच्या या अनाधिकृत फेरीवाल्यांविरूद्ध वारंवार तक्रारी महापालिकेस प्राप्त होत होत्या. त्यामुळे महापालिकेच्या प्रभाग समितीने येथील अनाधिकृत हातगाडयांवर कारवाई कारवाया करुन अनाधिकृत फेरीवाले हटविले असे उपायुक्त मुठे म्हणाले. बाणेगर गल्लीतील या अनाधिकृत फेरीवाल्यां विरूद्ध महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे आमची सुटका झाली. आम्ही या फेरीवाल्यांच्या दहशतीखाली असतो अशा शब्दांत रहिवाशांनी आपल्या होणारा त्रास व्यक्त केला.  

टॅग्स :mira roadमीरा रोडMNSमनसेcongressकाँग्रेसhawkersफेरीवाले