ठाणे : मेट्रोच्या कामात बाधीत होणाऱ्या वृक्षांबाबत आता एमएमआरडीएने आता पावले उचलली आहेत. या वृक्षांचे जसेच्या तसे पुनर्रोपणासाठी आता या प्राधिकरणाकडून हालचाली सुरू केल्या आहेत. यासाठी ठाणे महापालिकेकडील ट्री ट्रान्सप्लान्टेशन मशिन भाड्याने घेण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार ते भाड्याने देण्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून तो येत्या १९ डिसेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे. मात्र, बाधीत होणाºया वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचे निश्चित केले असले तरी ते कुठे आणि कसे होणार याबाबतचे धोरण अद्याप निश्चित झालेले नाही.
वडाळा ते कासारवडवली या मेट्रो चारचे काम सध्या जोरात सुरू आहे. ठाण्यात यासाठी २०२३ च्या आसपास वृक्षांची कत्तल केली जाणार आहे. परंतु, ही कत्तल रोखण्यासाठी शहरातील काही दक्ष नागरिक न्यायालयातदेखील गेले आहेत. यावरून सध्या वादंगही सुरूआहे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तिनहातनाका परिसरातील वृक्षांची तोड करण्याचा प्रकारही घडला होता. परंतु त्यानंतर आता वृक्षांची कत्तल न करता त्यांचे पुनर्रोपणाचा विचार मेट्रो प्राधिकरणाने सुरू केला आहे. आ
ता त्यासाठी ठाणे महापालिकेची मदत घेतली जाणार आहे. ठाणे महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी ट्री ट्रान्स्प्लान्टेशन मशिन खरेदी केले होते. त्यानंतर आतापर्यंत महापालिकेने रस्ता रुंदीकरणांच्या कामांत बाधीत होणाºया ५० हून अधिक वृक्षांचे या मशिनच्या सहाय्याने पुनर्रोपण केले आहे. आता याच मशिनचा वापर मेट्रो प्राधिकरण करणार आहे. त्यानुसार त्यांनी या मशिनची मागणी केली आहे. याच अनुषंगाने हा प्रस्ताव तयार केला आहे.
प्रतिदिन ३५ हजार ६८० रुपये भाडे
महापालिकेने हे मशिन चार कोटींच्या आसपास खरेदी केले होते. आता ते भाड्याने दिल्याने पालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. त्यानुसार आता याचे प्रती दिन आठ तासांचे भाडे निश्चित करण्याचा प्रस्ताव १९ डिसेंबरच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवला आहे. इंधना व्यतिरिक्त हे दर आकारण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रतीदिन ३५ हजार ६८० रुपये भाडे आकारले जाणार आहे.
तीदिन ८ वृक्षांचे पुनर्रोपण
सध्या हे मशिन दिवसातील एका तासात एका वृक्षाचे पुनर्रोपण करू शकणार आहे. त्यानुसार दिवसातील आठ तास पकडले तर प्रतीदिन ८ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येईल, असे बोलले जात आहे. यातून पालिकेला लाखोचे उत्पन्न मिळणार असल्याचे पालिकेचे म्हणने आहे.