लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २९ जुलै ते १२ आॅगस्ट या कालावधीत मनाई आदेश लागू केला आहे. त्यामुळे या कालावधीत कोणत्याही राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांना सर्व प्रकारच्या आंदोलनांना बंदी घातल्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी या मनाई आदेशामध्ये म्हटले आहे.कोरोना या साथीच्या आजाराला नियंत्रित आणण्यासाठी ठाणे शहरासह जिल्हयात प्रशासनातर्फे विविध निर्बंध लागू केले आहेत. विविध मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांच्याकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, आदी आंदोलनाची शक्यता असते. त्याचवेळी ६ आॅगस्ट २०२१ रोजी चालीया उत्सव आहे. तो पुढे ४० दिवस राहणार आहे. तर १० आॅगस्ट रोजी मोहरम मासारंभ असे उत्सवही होणार आहे. त्यामुळेच हा मनाई आदेश लागू केला असून या काळात कोणत्याही प्रकारचे शस्त्रे बाळगणे, वाहून नेणे किंवा तयार करणे तसेच कोणताही दाहक अथवा स्फोटक पदार्थ बाळगण्याला ही बंदी आहे.*तसेच सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा एखाद्याच्या प्रतिमेचे दहन करणे अशा सर्वच बाबींना बंदी आहे. या काळात पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहिर सभा घेणे, मिरवणूका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे आदींनाही मनाई आहे.* मात्र, लग्न कार्यासाठी जमा होणारे वºहाडी, अंत्यसंस्काराची मिरवणूक, न्यायालयीन कामकाज आणि पोलिसांसह शासकीय कामासाठी हा मनाई आदेश लागू राहणार नसल्याचेही पोलीस आयुक्तांनी यात म्हटले आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पुन्हा मनाई आदेश लागू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 9:25 PM
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २९ जुलै ते १२ आॅगस्ट या कालावधीत मनाई आदेश लागू केला आहे. मात्र, लग्न कार्यासाठी जमा होणारे वºहाडी, अंत्यसंस्काराची मिरवणूक, न्यायालयीन कामकाज आणि पोलिसांसह शासकीय कामासाठी हा मनाई आदेश लागू राहणार नसल्याचेही पोलीस आयुक्तांनी यात म्हटले आहे.
ठळक मुद्देसर्व प्रकारच्या आंदोलनांना बंदी स्फोटक पदार्थ बाळगण्यालाही बंदी