पोळी-भाजी केंद्रे, खाद्यगृह, बार-रेस्टॉरंट, परमिट रूम, आइस्क्रीम पार्लर, ज्युस सेंटर यांना ११ वाजेपर्यंतची मुभा दिली आहे. परंतु, हातगाड्यांवरील खाद्यपदार्थांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच परवानगी दिली आहे. डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरात काही खाद्यपदार्थांच्या हातगाड्या सातनंतर सुरू होत्या. शिववडापावच्या गाड्या राजरोस सुरू होत्या. याठिकाणी खवय्यांची गर्दी दिसून आली. स्थानक परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद होती. परंतु, मानपाडा रोडवर कपडे, बूट-चप्पल, ज्वेलर्स ही दुकानेदेखील रात्री सुरूच होती. पाथर्ली परिसरात मटणविक्रीची दुकाने शटर अर्ध्यावर ठेवून बिनदिक्कत सुरू होती.
खाऊगल्ली म्हणून ओळख असलेल्या पेंढरकर महाविद्यालयाच्या बाहेरील रस्त्यावर लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या मात्र संध्याकाळी बंद होत्या. रिक्षात दोन प्रवाशांना परवानगी असताना रिक्षाचालकांकडूनही जादा प्रवासी भरून वाहतूक सुरू असल्याचे व नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. शेलारनाका परिसरात नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित जमा झाले होते. त्यामुळे निर्बंध घालण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेल्याचे दिसून आले. कारवाई होण्याच्या भीतीने कपड्याच्या दुकानाबाहेरील स्टॅच्यू आतमध्ये नेले होते. परंतु, दुकाने सुरू होती. दरम्यान, नऊनंतर मात्र पोलिसांनी दट्ट्या दिल्यावर अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश दुकाने बंद झाल्याचे दिसून आले.
------------------------------------------------------
वाचली