शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
भारत बनवणार अण्वस्त्रांनी सुसज्ज दोन पाणबुड्या! केंद्राची ४० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी
3
Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच
4
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
5
चलो भगवान भक्तीगड! धनंजय मुंडे पहिल्यांदाच बहीण पंकजासोबत सावरगाव घाटला जाणार
6
हरयाणात भाजप दलित नेत्याला उपमुख्यमंत्री करणार का? राजकीय चर्चांना उधाण
7
चिडलेल्या स्थितीत दुकानाबाहेर पायऱ्यांवरच का बसून राहिली IAS अधिकारी टीना डाबी?
8
टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 
9
'तुम्हाला भेटायचं राहूनच गेलं..'; रतन टाटांवर धर्मेंद्र यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट
10
रुबिना दिलैकने केला रॅम्प वॉक, पडता पडता वाचली; नंतर अभिनेत्रीच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक
11
रतन टाटांनी मान्य केली होती नॅनोतील 'ती' चूक; ट्रकमधून बंगालवरुन गुजरातला हलवला प्रकल्प
12
पैसाच पैसा! घरात सर्वत्र नोटांचे बंडल; नवऱ्यानेच केला लाचखोर इंजिनिअर बायकोचा पर्दाफाश
13
"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?
14
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
15
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
16
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
17
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
18
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
19
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
20
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'

ठाण्यात पुन्हा निर्बंधांची वेसण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:40 AM

ठाणे : राज्य शासनाने कोरोनाबाबत पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. यानुसार ठाण्यातील हॉटेल, बार, मल्टिप्लेक्स व इतर आस्थापना ...

ठाणे : राज्य शासनाने कोरोनाबाबत पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. यानुसार ठाण्यातील हॉटेल, बार, मल्टिप्लेक्स व इतर आस्थापना या रात्री ११.३० पर्यंत सुरू राहणार आहेत, तर दुकाने ९.३० पर्यंत खुली ठेवण्याच्या सुचना आहेत. तसेच या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले तर त्या आस्थापना सील करून जोपर्यंत कोरोना थांबत नाही तोपर्यंत ते काढण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी बुधवारी स्पष्ट केले. या मार्गदर्शक सूचनांचे पालन ३१ मार्च २०२१ पर्यंत बंधनकारक आहे

महापालिका मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यापूर्वी जे नियम आखले होते, तेच आताही लागू असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी बुधवारी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात हॉटेल, बार, मल्टिप्लेक्स, दुकाने, बाजारपेठांमधील प्रतिनिधी आदींसह इतर आस्थापनांची बैठक घेतली. या बैठकीत शासनाने दिलेल्या आदेशाची माहिती या आस्थापनांच्या प्रतिनिधींना दिली असून, त्यांनीदेखील नियमांचे पालन केले जाईल, असे स्पष्ट केल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

मल्टिप्लेक्स, मॉल, हॉटेल, बार आदी ठिकाणी ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त गर्दी नसावी, मास्कशिवाय परवानगी नाही, प्रत्येकाचे तापमान तपासून प्रवेश देणे, लक्षणे असणाऱ्यांना प्रवेश नाही, हॅन्ड सॅनिटाझर प्रत्येक ठिकाणी प्रवेशद्वारावर असावे, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, शॉपिंग मॉलमध्ये असलेल्या सिनेमागृह, रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देताना घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन होणार नाही, याची योग्य ती खबरदारी व्यवस्थापनाने घ्यावी,

कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांकृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्या मालकावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

लग्न समारंभासाठी ५० व्यक्ती व अंत्यविधीसाठी २० व्यक्तीच

यापूर्वी लग्न समारंभासाठी १०० माणसांना परवानगी दिली जात होती. परंतु, आता ती ५० माणसांनाच असणार आहे. तसेच अंत्यविधीसाठीही २० माणसांचीच परवानगी असणार आहे.

गृह विलगीकरणासाठी निर्बंधांसह परवानगी

स्थानिक प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली गृहविलगीकरण करण्यात येईल. १४ दिवसांसाठी ते असल्याचे फलक संबंधित घरांवर व इमारतींच्या प्रवेशद्वारावर लावले जाणार आहे. कोराेना पॉझिटिव्ह रुग्णाच्या हातावर क्वॉरंटाईनचा शिक्का मारला जाणार असून, त्याच्या घरातील इतर सदस्यांनी बाहेर जाणे टाळावे व मास्कचा वापर करावा, या आदेशाचे उल्लंघन केल्यास गृहविलगीकरण केलेल्या व्यक्तिला तत्काळ कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवावगळता इतर आस्थापनात ५० टक्के उपस्थिती

आरोग्य सेवा व इतर अत्यावश्यक सेवावगळता इतर खासगी किंवा शासकीय कार्यालयांमध्येही पूर्वीप्रमाणे ५० टक्के उपस्थिती ठेवावी लागणार आहे. त्यातही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याची जबाबदारी संबंधीत आस्थापनाने घ्यावी. तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणीदेखील ऑनलाईन बुकिंग करून दर्शन घ्यावे.