शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

निकाल लागला, मार्कशीट मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2019 12:51 AM

बीए मराठीच्या विद्यार्थ्यांचा पेच; पुढील शिक्षण घेताना येताहेत अडचणी

- जान्हवी मोर्येडोंबिवली : के.व्ही. पेंढरकर महाविद्यालयातून एप्रिल-मे २०१९ मध्ये मराठी विषय घेऊन तृतीय वर्ष बीएच्या परीक्षेला बसलेल्या १३ पैकी तीन विद्यार्थ्यांना मार्कशीट देण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित १० जणांना ते अजूनही दिलेली नाहीत. मार्कशीट विद्यापीठाकडून आले नसल्याचे कारण वारंवार सांगितले जात असल्याने पालकांनी महाविद्यालयाकडे विचारणा करताच क्लार्कने आॅनलाइन निकालाची प्रत पाहून त्यावर रिझर्व्ह फॉर लोअर एक्झाम (आरईएल) असे लिहिले आहे. त्यामुळे निकाल विद्यापीठाने थांबून ठेवला आहे, असे सांगितले.महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राजक्ता प्रधान हिने ही परीक्षा दिली होती.

मात्र, निकाल लागून सहा महिने होऊनही तिला मार्कशीट दिलेले नाही. यामुळे माझ्या पुढील शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत आहे. याबाबत मुंबई विद्यापीठात पालकांनी चौकशी केली असता महाविद्यालयाने चौथ्या सेमिस्टरची मार्क शीट जमा न केल्याने निकाल राखून ठेवल्याचे सांगितले. तर, विद्यार्थ्याला एटीकेटी लागल्याने विद्यापीठाकडून निकाल आला नसल्याचे महाविद्यालयाने सांगितले आहे. मात्र, प्राजक्ता हिने मात्र आपल्याला केटी नसल्याचे सांगितले.

एप्रिल-मे मध्ये झालेल्या पदवी परीक्षेचा निकाल जूनपर्यंत लागतो. सध्या सर्वच निकाल प्रथम आॅनलाइनद्वारे जाहीर होतात. त्यानंतर काही दिवसांतच त्याचे मार्कशीट मिळते. जूनमध्ये प्राजक्ता महाविद्यालयात मार्क शीट घेण्यासाठी गेली असता तिला विद्यापीठाकडून मार्क शीट आले नसल्याचे क्लार्कने सांगितले. निकाल लागून सध्या सहा महिने होत आले तरी मार्कशीट मिळालेले नाही. त्यामुळे तिला विद्यापीठाच्या कलिना येथील दुरस्थ शिक्षण विभागातून एमएचे शिक्षण घेताना त्रास होत आहे.

विद्यापीठातून तिला लिंक मिळत नसल्याने दुरस्थ विभागाचे लेक्चर कधी सुरू होणार आहेत किंवा इतर कोणतीही माहिती मिळत नाही. या विभागातर्फे नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये काही लेक्चर घेतले जातात. हे लेक्चर ७ डिसेंबरपासून सुरू होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. विद्यापीठातून तिला लिंक ओपन करून माहिती घ्या, असे सांगितले जात आहे. मूळ मार्कशीटची प्रत न दिल्याने ही लिंक ओपन होत नाही. शिवाय, परीक्षा देता येणार नाही. मार्कशीटमुळे सर्वच गोष्टी अडल्याचे प्राजक्ता हिने सांगितले.केटी सोडवली असेल तर सांगितले पाहिजे

पेंढरकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शरद महाजन यांनी सांगितले, प्राजक्ता प्रधान यांना एसवायबीएच्या चौथ्या सेमिस्टरला केटी लागली आहे. जोपर्यंत केटी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यापीठाकडून रिझल्ट मिळत नाही. त्या निकालावर आरईएल लिहिले आहे. प्राजक्ता यांनी एटीकेटी सोडवली असेल त्यांनी आम्हाला सांगितले पाहिजे. वारंवार विद्यापीठाला पत्र पाठवावे लागते. १५ आॅक्टोबर २०१९ ला पत्र पाठविले आहे. १७ आॅक्टोबरला विद्यापीठाचा शिक्का आहे. ३७ विद्यार्थ्यांचा निकाल आरईएल आहे. त्यापैकी चार मुले पुढे आली असून, त्यांचा निकाल विद्यापीठाकडे पाठविला आहे. चार ते पाच विद्यार्थ्यांनी फी भरली नाही. त्यांच्याशी बोलून आम्ही त्यांना निकाल देतो.

टॅग्स :Studentविद्यार्थीResult Dayपरिणाम दिवस