लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्यातील कॅन्टीनचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली निवृत्त सहायक आयुक्तांची २८ लाखांची फसवणूक करणाºया अकबर पाशा उर्फ रोहित शेट्टी (४९) याला चितळसर पोलिसांनी बुधवारी तळोजा कारागृहातून अटक केली. त्याला ४ जानेवारी २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.ठाण्यातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्त संजय सुर्वे (६१) यांचा मुलगा क्षितीज याने हॉटेल मॅनेजमेेंटचा कोर्स केला आहे. त्यामुळे एखादे हॉटेल भाडयाने चालविण्यासाठी सुर्वे हे पाहणी करीत होते. जून २०१५ ते मे २०१६ या काळात रोहित शेट्टी, भगवान पवार आणि त्याची पत्नी पल्लवी पवार यांनी अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्यातील सुसज्ज कॅन्टीनचे कंत्राट सुर्वे यांच्या मुलाला मिळवून देण्यासाठी संबंधित वरिष्ठ अधिकाºयाशी आपला चांगला परिचय असल्याची बतावणी केली. थोडे प्रयत्न आणि काही पैसे खर्च केल्यास हे कंत्राट पाच वर्षांसाठी त्यांच्या मुलाला मिळवून देऊ शकतात, असा दावाही त्याने केला. हे कंत्राट फायदेशीर असल्याचे सांगून त्यांना काही रक्कम गुंतविण्यासाठी त्यांचे मन वळविले. या त्रिकुटावर विश्वास ठेवून सुर्वे यांनी काही रोकड आणि धनादेशाने अशी २८ लाखांची रक्कम त्यांना दिली. ही रक्कम मिळाल्यानंतरही रोहित किंवा त्याच्या इतर दोन्ही साथीदारांनी कंत्राट देण्याचे कोणतेही काम केले नाही. त्यानंतर सुर्वे यांनी त्यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी करुनही त्याने ही रक्कम परत न करता त्याचा अपहार करुन त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात सुर्वे यांनी २९ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. अशाच एका प्रकरणात कासारवडवली पोलिसांनी रोहित याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे त्याची तळोजा येथील कारागृहात रवानगी झाली होती. त्यानुसार ठाणे न्यायालयाच्या परवानगीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड आणि पोलीस निरीक्षक आर. बी. भिलारे यांनी तळोजा कारागृहातून ३० डिसेंबर २०२० रोजी त्याला ताब्यात घेतले.
कॅन्टीनचे कंत्राट देण्याच्या नावाखाली निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची २८ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 5:08 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अंबरनाथ येथील आयुध निर्माण कारखान्यातील कॅन्टीनचे कंत्राट मिळवून देण्याच्या नावाखाली निवृत्त सहायक आयुक्तांची २८ ...
ठळक मुद्देअकबर पाशा याला अटकतळोजा कारागृहातून घेतले ताब्यात