शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
4
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
7
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
8
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
10
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
11
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
12
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
13
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
14
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
15
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
16
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
17
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
18
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
19
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
20
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

पुनर्वसन धोरण रखडले

By admin | Published: June 03, 2017 6:19 AM

केडीएमसीने अजूनही पुनर्वसन धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या रहिवाशांचे

मुरलीधर भवार/  लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : केडीएमसीने अजूनही पुनर्वसन धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन होऊ शकले नाही. धोरण ठरवण्यासाठी नेमलेली समिती आठ महिने होऊनही त्याचा मसुदा तयार करण्याचे काम करत आहे. त्याचा फटका रस्ते विकास प्रकल्पात बाधित झालेल्यांना बसला आहे. रस्ते विकास प्रकल्पातील बाधितांना बीएसयूपी योजनेत घरे देण्याचा प्रस्ताव शुक्रवारच्या स्थायी समितीच्या पटलावर होता. त्याला सभागृह नेते व स्थायी समिती सदस्य राजेश मोरे यांनी विरोध केला. महापालिकेने पुनर्वसनाचे धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे या नागरिकांचे पुनर्वसन रखडले आहे. पुनर्वसन धोरण ठरवण्यासाठी पालिकेने आठ महिन्यांपूर्वी समिती नेमली होती. मात्र, या समितीने अहवाल सादर केला नाही. पालिकेतील चार अधिकारी या समितीत आहेत. त्याचे मुख्य कामकाज शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्याकडे आहे. या समितीने धोरण का जाहीर केले नाही, असा सवाल मोरे यांनी करताच येत्या महासभेत त्याचा मसुदा मंजुरीसाठी ठेवला जाईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.मोरे म्हणाले की, महासभेत यापूर्वी पुनर्वसन धोरण करण्यासाठी चार तहकुबी सूचना मांडलेल्या आहेत. प्रशासनाने त्याची दखल घेतलेली नाही. पालिका रस्ते विकासासाठी रस्त्यालगत असलेली घरे तोडते. त्या प्रकल्प बाधितांना त्याच्या बदल्यात घर देत नाही. अनेक बाधितांना त्याची घरे मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन झालेले नाही. मोरे यांच्या प्रश्नाला महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही दुजोरा दिला आहे. पुनर्वसन समिती करते काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. यासंदर्भात शहर अभियंता कुलकर्णी म्हणाले की, ‘पुनर्वसन समितीने मसुदा तयार केलेला आहे. त्यास आयुक्तांकडून मान्यता घेतली जाईल. त्यानंतर, तो महासभेसमोर ठेवला जाईल.’ धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचा विसरमहापालिका हद्दीत ५३१ धोकादायक इमारती आहेत. त्यापैकी २०२ इमारती अतिधोकादायक असून, त्या लवकरच रिकाम्या करून पाडल्या जाणार आहेत. अन्य इमारती धोकादायक असून त्यात ४० हजार रहिवासी आहेत. या रहिवाशांना पालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर इमारती रिकाम्या करण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना लागू करण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने तयार केलेला आघात मूल्यांकन अहवाल राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.धोकादायक इमारतीमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. मात्र, अशा इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन महापालिकेस बंधनकारक नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचा विचार करणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. महापालिकेने पुनर्वसन समितीत या रहिवाशांच्या पुनर्वसनाविषयी धोरण ठरवण्याचा मुद्दा घेणे आवश्यक होते. परंतु, त्यांचा विचार झालेला नाही.बीएसयूपी योजनेत दोन हजार घरे बांधून तयार आहेत. त्यातील सगळीच घरे झोपडीधारकांसाठी नाहीत. त्यात प्रकल्प बाधितांना सामावून घेणे. तसेच धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना त्यांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नाममात्र भाडेतत्त्वावर ही घरे द्यावीत. त्यासाठी सरकारदरबारी महापालिका आयुक्तांनी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याला सरकारने मान्यता दिलेली नाही.बीएसयूपीतील घरे पडून आहेत. त्यामुळे काही घरांच्या काचा फुटल्या आहेत. वापराविनाच घरांची दुरवस्था होणार आहे. पुन्हा त्याची देखभाल दुरुस्ती महापालिकेस करावी लागणार आहे. पुनर्वसन धोरण ठरून लाभार्थ्यांना त्याचे वाटप झाले असते, तर त्याचा योग्य वापर झाला असता, असे सूत्रांचे म्हणणे आहे.