शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

१ जून रोजीचा उत्तन बंद मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:21 AM

मीरा रोड : बेकायदा कचरा डम्पिंगविरोधात धारावी बेट जनआक्र ोश समितीने १ जून रोजी दिलेली ‘उत्तन बंद’ची हाक सोमवारी पालिका आयुक्तांसोबतच्या बैठकीत आंदोलन समितीच्या सदस्यांनी मागे घेतली. आयुक्तांनी शहरात २० जागांवर लहान प्रकल्प उभारण्याचे आश्वासन देत पुन्हा वेळ मागून घेतली. त्यानुसार, १५ दिवसांनी आयुक्तांनी पर्यायी कचरा व्यवस्थेबद्दल केलेल्या उपाययोजनांची माहिती ...

मीरा रोड : बेकायदा कचरा डम्पिंगविरोधात धारावी बेट जनआक्र ोश समितीने १ जून रोजी दिलेली ‘उत्तन बंद’ची हाक सोमवारी पालिका आयुक्तांसोबतच्या बैठकीत आंदोलन समितीच्या सदस्यांनी मागे घेतली. आयुक्तांनी शहरात २० जागांवर लहान प्रकल्प उभारण्याचे आश्वासन देत पुन्हा वेळ मागून घेतली. त्यानुसार, १५ दिवसांनी आयुक्तांनी पर्यायी कचरा व्यवस्थेबद्दल केलेल्या उपाययोजनांची माहिती बैठक घेऊन द्यावी. जर समाधान झाले नाही, तर आंदोलन करू, अशी भूमिका समितीने घेतली. त्यामुळे १ जून रोजीचे आंदोलन बारगळले आहे. याआधीही १ मे पासून डम्पिंग बंदचा इशारा समितीने दिला होता, मात्र तो स्थगित केला होता.मीरा-भार्इंदर महापालिका ही शहराचा रोजचा सुमारे ४५० टन कचरा हा उत्तनच्या धावगी येथे कुठलीही प्रक्रि या न करताच टाकत आहे. १० वर्षांपासून पालिकेने अशाच प्रकारे प्रक्रि या न करता टाकलेला बेकायदेशीर कचरा आजही तसाच पडून आहे. शहरात ओला व सुका कचरा वेगळा करणे, त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, वेगवेगळे लहान प्रकल्प उभारणे, यासोबतच कचरा प्रकल्प स्थलांतरित करण्यातदेखील पालिका सपशेल अपयशी ठरली आहे . याविरोधात धारावी बेट जनआक्र ोश मोर्चा स्थापन करून १ मे रोजी कचऱ्याच्या गाड्या अडवण्याचे आंदोलन जाहीर करण्यात आले होते. पालिकेत झालेल्या बैठकीतून काहीच निष्पन्न न झाल्याने अखेर १ जून रोजी उत्तन बंद व उत्तन पोलीस ठाण्यात जाऊन महापालिका अधिकारी, ठेकेदार यांच्याविरोधात नागरिकांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्याचे जाहीर केले होते. उत्तन भागात तर अनेक ठिकाणी बंदची पत्रके वाटण्यात आली. रविवारी यासंदर्भात बैठकदेखील झाली.दरम्यान, आज सोमवार २८ मे रोजी समितीच्या सदस्यांची आयुक्त बालाजी खतगावकर व अन्य अधिकारी यांच्यासोबत महापालिकेत बैठक झाली. यावेळी सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आंदोलन समितीचे समन्वयक लिओ कोलासो, नगरसेविका हेलन गोविंद, शर्मिला बगाजीसह जेनवी अल्मेडा, रेनॉल्ड बेचरी, विद्याधर रेवणकर, एडविन घोन्सालवीस, एडवर्ड कोरिया, इग्नेशियस अल्मेडा उपस्थित होते.उत्तन कचरा प्रकल्प तातडीने बंद करणे शक्य नसून तसे झाल्यास संपूर्ण शहरात कचºयाची समस्या बिकट होईल, असे आयुक्तांनी या वेळी सांगितले. आयुक्तांनी केलेल्या विनंतीनुसार व त्यांनी घेतलेली भूमिका सकारात्मक वाटल्याने १ जून रोजीचा बंद तसेच पोलीस ठाण्यात जाऊन तक्र ारी देण्याचे आंदोलन स्थगित केल्याचे रेनॉल्ड बेचरी, विद्याधर रेवणकर यांनी सांगितले.