शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
3
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
4
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
5
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
6
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
7
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
8
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
9
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
10
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
11
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
12
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
13
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
14
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
15
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
16
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
17
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
18
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
19
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी
20
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."

कोकेन विक्रीसाठी आलेल्या दोघा नायजेरियनसह रिक्षाचालक जेरबंद ; ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त

By अजित मांडके | Published: April 01, 2023 6:28 PM

दोन्ही नायजेरियन हे नालासोपारा येथे वास्तव्यास आल्याचे समोर आले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे - कासारवडवली,आनंदनगर आणि वागळे इस्टेट, इंदिरानगर या दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत कोकेन व एलएसडी असे अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या पॉल चुकवु (४८) आणि गोक लॉरेन्स अजाह (३२) या दोघा नायजेरियन व्यक्तीसह रिक्षाचालक लक्ष्मण अनिरूध्द साव (२७) अशा तिघांना ठाणे शहर पोलिसांच्या वागळे इस्टेट गुन्हे शाखेच्या युनिट ५ जेरबंद केले. त्यांच्याकडून एकूण ६१ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये १४७ ग्रॅम वजनाचा कोकेनचा समावेश आहे. तसेच ते दोन्ही नायजेरियन हे नालासोपारा येथे वास्तव्यास आल्याचे समोर आले आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

वागळे युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना २९ मार्च २०२३ रोजी घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे  पॉल चुकवु नामक नायजेरियन इसम हा कोकेन  अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत. अशी माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करत, त्याला ताब्यात घेतले. तसेच यावेळी त्याच्याकडून १२ लाख ८० हजार रुपये किमतीचे ३२ ग्रॅम कोकेन व  १ लाख २० हजार रुपये किंमतीचे ०.२२ ग्रॅम वजनाचे L.S.D १५ नग डॉट हा अंमली पदार्थ व १ हजार ९४० रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकुण १४ लाख ०१ हजार ९४० रुपये किंमतीचा हस्तगत करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक केली. तसेच वागळे इस्टेट, इंदिरानगर येथे रिक्षातुन गोक अजाह नामक नायजेरीयन इसम कोकेनची विक्रिसाठी येत आहे. अशी माहिती मिळाल्यावर त्या नायजेरियन याच्यासह मुंबईतील साव नामक रिक्षाचालकाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४६ लाखांचा ११५ ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ, १ लाखांची रिक्षा व रोख एक हजार एकुण ४७ लाख ०१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी श्रीनगर पोलीस गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

त्या दोन्ही प्रकरणात गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू आहे. ही कारवाई गुन्हे शाखा वागळे युनिट-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक भुषण शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक, अविनाश महाजन, पोलीस उपनिरीक्षक, शिवाजी कानडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनिल अहिरे, पोलीस हवालदार सुशांत पालांडे, रोहीदास रावते, प्रकाश पाटील, विजय काटकर, सुनिल निकम, न्हावळदे, सुनिल रावते, संदिप शिंदे, मिनाक्षी मोहीते, सुनिता गिते, पोलीस नाईक रघुनाथ गार्डे, उत्तम शेळके, ठाणेकर, यश यादव या पथकाने केली आहे.