शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

लॉकडाउननंतर रिक्षाभाडेवाढ अटळ; प्रवाशांना भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 1:07 AM

फिजिकल डिस्टन्सिंगमुळे प्रवासीसंख्येवर मर्यादा

- प्रशांत माने कल्याण : लॉकडाउनमुळे दोन महिने व्यवसाय बंद असल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच लॉकडाउननंतर फिजिकल डिस्टन्सिंगमुळे रिक्षातून प्रवास करणाऱ्यांच्या संख्येवरही मर्यादा येणार आहे. त्यामुळे नुकसान भरून काढण्यासाठी रिक्षाचालकांकडून भाडेवाढ केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, आरटीओकडून भाडेवाढीला मान्यता मिळण्यापूर्वीच छुप्या भाडेवाढीचा भुर्दंड प्रवाशांना सोसावा लागणार आहे.

कोरोनामुळे १८ मार्चपासून रिक्षा व्यवसाय बंद आहे. त्यामुळे जगणे कठीण झाल्याने रिक्षाचालकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली होती. मात्र, ती मंजूर झाली नाही. उपासमारीची वेळ आल्याने मुंबई आणि ठाण्यातून सुमारे २५० ते ३०० रिक्षाचालकांनी रिक्षासह गावची वाट धरली आहे. दरम्यान, परराज्यात गेलेल्या रिक्षाचालकांची अधिकृत नोंदही रिक्षासंघटनांकडे नाही.

कल्याण-डोंबिवलीत २८ हजार रिक्षा असून, त्यातील ९० टक्के रिक्षा शेअर पद्धतीने चालतात. काही रिक्षाचालक गावी गेल्याने ऐन पावसाळ्यात रिक्षांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. जूनमध्ये लॉकडाउन शिथिल झाल्यास काही अटीशर्थींचे पालन करूनच रिक्षाचालकांना व्यवसायास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. शेअर रिक्षात दोघांनाच प्रवासाची मुभा असेल, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेअर रिक्षाचालक तिसºया व चौथ्या प्रवाशाचे भाडे दोघा प्रवाशांकडून वसूल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेअरचे भाडे २० ते २५ टक्क्यांनी वाढले, अशी सूत्रांची माहिती आहे.

सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे रिक्षा प्रवास सुरू करायचा की नाही, त्याबाबत एमएमआरटीए जो निर्णय देईल, त्याप्रमाणे नियोजन केले जाईल. भाडेवाढीचा निर्णय हा धोरणात्मक आहे. राज्य सरकारकडून ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या जातील, त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाईल.- संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण

दोन महिने व्यवसाय बंद असल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा चालविण्यास परवानगी मिळाली तर फिजिकल डिस्टन्सिंगमुळे प्रवासीसंख्येवर मर्यादा येणार आहेत. रिक्षाचालकाचे नुकसान भरून काढण्यासाठी भाडेवाढ करणे हे अटळ आहे. आरटीओकडून जे भाडे ठरविले जाईल, ते स्वीकारण्याची आमची तयारी आहे. लॉकडाउनमुळे प्रवाशांना भुर्दंड पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्यासाठी दरवाढीचे फलक लावले जातील.- प्रकाश पेणकर,अध्यक्ष, रिक्षा-टॅक्सी महासंघ

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण