शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची 'ती' मागणी भाजपसाठी ठरतेय डोकेदुखी; सत्तास्थापनेतील मुख्य अडथळा समोर
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! नावाची घोषणा नंतर करणार; दिल्लीच्या बैठकीत काय घडलं?
3
मुख्यमंत्रिपदावर पेच, शपथविधी लांबणीवर; ५ डिसेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार?
4
PAN 2.0: नवीन पॅन कार्डमुळे फसवणूक करणं खूप अवघड, जाणून घ्या सर्वसामान्यांना कसं मिळणार संरक्षण?
5
एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; शिवसेना नेत्याचा दावा, नेमकं काय घडतंय?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: चांगली बातमी मिळू शकेल, धनलाभ संभवतो!
7
विधानसभेत ७८ नवीन चेहरे, जे पहिल्यांदाच आमदार बनले; कोणत्या पक्षाचे किती सदस्य?
8
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
9
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
10
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
11
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
12
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
13
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
14
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
15
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
16
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
17
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
18
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
19
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

रिक्षाचालक, दुकानदारांमध्ये तणाव

By admin | Published: October 08, 2015 12:29 AM

अंबरनाथ स्टेशन परिसरातील पूर्व आणि पश्चिम भागांत चालक हे दुकानांच्या समोरच रिक्षा उभ्या करून भाडे आकारत असल्याने दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.

अंबरनाथ : अंबरनाथ स्टेशन परिसरातील पूर्व आणि पश्चिम भागांत चालक हे दुकानांच्या समोरच रिक्षा उभ्या करून भाडे आकारत असल्याने दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यामुळे या दुकानदारांनी रिक्षाचालकांना दुकानासमोर रिक्षा उभ्या न करण्याचा सल्ला देताच त्यांच्यात वादावादी सुरू झाली आहे. अंबरनाथ स्टेशन परिसरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढत असून काही रिक्षाचालक थेट रस्त्यावरच भाडे घेण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. एवढेच नव्हे तर पादचाऱ्यांना या रस्त्यावरून चालणेदेखील अवघड जात आहे. चुकीच्या पद्धतीने रिक्षा उभ्या करणाऱ्यांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने आता या त्यांच्या चालकांनी स्टेशन परिसरातील दुकानदारांच्या समोरच लांबलचक रिक्षांच्या रांगा लावून साइड भाडे घेण्याचे काम सुरू केले आहे. त्यांच्या या प्रवृत्तीमुळे स्टेशन परिसरातील दुकानदारांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे रिक्षाचालक आणि दुकानदार यांच्यात अनेक वेळा खटके उडाले आहेत. बुधवारी दुपारी या त्रासाला कंटाळून दुकानदारांनी चालकांना रिक्षा काढण्यास सांगितल्याने त्यांच्यात वादावादी सुरू झाली. वाढता तणाव लक्षात घेता वाहतूक विभागाचे सुरेश इंगळे यांनी हस्तक्षेप करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पर्यायी जागा नसल्याने रिक्षाचालकही माघार घेण्यास तयार झाले नाहीत. अखेर, हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यावर येत्या काही दिवसांत तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरीकडे स्टेशनकडे जाणारा रस्ता हा एकेरी वाहतुकीसाठी असतानाही रिक्षाचालक याच रस्त्यावर भाडे स्वीकारण्यासाठी कसे उभे राहतात, हा प्रश्न पालिका प्रशासन आणि वाहतूक प्रशासनाने अद्याप सोडविलेला नाही. तसेच गेल्या तीन महिन्यांत वाहतूक व्यवस्थेत बदल केल्यापासून वाद वाढले असून समस्या कायम राहिली आहे. सर्वात मोठी समस्या ही रिक्षा स्टॅण्डची असून मुख्य रिक्षा स्टॅण्डवर सर्वच रिक्षाचालक जात नसल्याने हे वाद वाढले आहेत.