ठाणे - ठाणे महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून पेट्रोल अथवा डिझेलवर धावणाऱ्या रिक्षापेक्षा सौरउर्जेवर धावणाऱ्या रिक्षाला महत्व दिले आहे. त्यानुसार महिला बालकल्याण तसेच इतर योजनेच्या माध्यमातून गरजू नागरिकांना व्यवसायासाठी यापुढे सौर उर्जेवर चालणारी रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पर्यावरणामधील घातक वायू कमी करणे हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी महापालिका मुख्यलयात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी या उपक्र माचा शुभारंभ केला. पर्यावरण संवर्धनासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने विविध प्रकारचे उपक्र म राबवण्यात येत आहे. सौर उर्जेवर चालणारी रिक्षा हा देखील या उपक्र माचा महत्वाचा भाग आहे. यासाठीच ही सौर उर्जेवर चालणारी रिक्षा महापालिकेने प्रायोगिक तत्वावर घेतली आहे. संपूर्ण सौरऊर्जेवर चालणाºया या रिक्षामध्ये चार प्रकारच्या बॅटरी आहे. संपूर्ण आठ तास बॅटरी चार्ज केल्यानंतर ४८ तासांनी ऊर्जा या रिक्षामध्ये तयार होते. एकदा रिक्षा संपूर्ण चार्ज केल्यानंतर कमीतकमी १०० किमीचे अंतर कापता येते. कोणत्याही प्रकारचे इंधन यामध्ये नसल्याने यावर कोणत्या प्रकारचा कर देखील लागणार नाही. केवळ एकदा रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या रिक्षाची किंमत १ लाख ८० हजारांपर्यंत असून यासाठी महिला बाल कल्याणच्या माध्यमातून तसेच इतर योजनांच्या माध्यमातून ज्यांना व्यवसाय करण्याची इच्छा आहे अशा सर्व नागरिकांसाठी ही रिक्षा घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यापूर्वी महापालिकेच्या योजनांमधून नागरिकांना व्यवसाय करण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेलच्या रिक्षा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. मात्र आता पुढचे पाऊल म्हणून पर्यावरणाचे संवर्धन करणे हा या उपक्र मामागचा मुख्य उद्देश असल्याने व्यवसायासाठी अशा प्रकारच्या रिक्षा घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली. लोकप्रतिनिंधीनी देखील या उपक्र माचे स्वागत केले असून अशा प्रकारचा उपक्र म पर्यावरणाच्या संवर्धासाठी महत्वाचा असल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी सांगितले. ठाण्यामध्ये हा उपक्र म यशस्वी करण्यासाठी पालिका प्रशासन तर प्रयत्न करेलच मात्र हा उपक्र म अधिक यशस्वी करण्यासाठी नागरिकांना देखील पुढाकार घ्यायला हवा असे पाटील यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून आता सौर उर्जेवर धावणारी रिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 3:54 PM
ठाण्यातील आर्थिक दुर्बल घटकातील गरजूंना आता ठाणे महापालिका सौर उर्जेवर धावणारी रिक्षा उपलब्ध करुन देणार आहे. या रिक्षाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला.
ठळक मुद्देरिक्षा घेण्यासाठी महापालिका देणार कर्ज१ लाख ८० हजारात रिक्षा उपलब्ध