संजय नेवे, विक्रमगड‘शिक्षणाचा हक्क’ या कायद्यानुसार गावपाड्यांतील मुलांचे भविष्य घडावे, त्यांना शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हापरिषदेच्या माध्यमातून अनेक शाळा सुरू झाल्या. मात्र, आजघडीला पालकांचा कल खाजगी शाळा व आश्रमशाळांकडे असल्याने तालुक्यातील तब्बल २० शाळांची पटसंख्या नगण्य आहे.तालुक्यात एकूण १६ केंद्रे असून १ ते १० विद्यार्थी संख्या असलेल्या चौधरीपाडा, ठाकूरपाडा (शेवते), फणसपाडा, फुफाणेपाडा या चार जिल्हापरिषदेच्या शाळांची संख्या फारच कमी आहे, तर ११ ते २० विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या शाळांची संख्या १५ असून फुटखंडपाडा, आरंजपाडा, गिंभलपाडा, गहलेपाडा, अवचितपाडा, बोरसेपाडा, भानपूर, पलाटपाडा, म्हसेपाडा, वेडगेपाडा, मातेरपाडा, तांबडीपाडा, खुडेद, म्हसेपाडा, दुमाडपाडा या जिल्हापरिषद शाळांवरही हीच परिस्थिती आहे.
‘शिक्षणचा हक्क’ अडचणीत
By admin | Published: February 03, 2016 2:04 AM