कल्याण : सहा वर्षांच्या बालिकेवर लैगिंक अत्याचार करणा-या सागर पुंजाजी भारुडे (३०, रा. कोळसेवाडी) याला कल्याण अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. ए. ए. शेख यांनी अलीकडेच १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.पूर्वेत राहणाºया भारूडे याने शेजारच्या घरात राहणाºया सहा वर्षांच्या बालिकेला घरात कोंडून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना २०१६ मध्ये घडली होती. भारुडे याच्या घरातून पीडित बालिका रडत बाहेर येत असल्याचे तिच्या आईने पाहिले. पीडितेने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्या तक्रारीवरून भारुडे याच्या विरोधात कोळसेवाडीपोलीस ठाण्यात ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक करण्यात आलेल्या भारुडे याच्या विरोधात तपास अधिकारी मनीषा माने यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.न्या. शेख यांनी भारुडे याला दहा वर्षांची सक्तमजुरीची तसेच दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी वकील सचिन कुलकर्णी यांनी काम पाहिले.मुख्य तपास अधिकारी म्हणून एन.एस. रसाळ आणि पोलीस हवालदार आर. पी. घनदाट यांनी त्यांनामदत केली.
अत्याचाऱ्यास सक्तमजुरी, दंडाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:41 AM