शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

‘रिंगरोड’ला अडथळा घनकच-याच्या डोंगराचा : एमएमआरडीएची हटवण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 1:44 AM

कल्याण-डोंबिवलीच्या वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा महणून हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाला आधारवाडीतील कच-याचा डोंगर आडवा आला आहे.

मुरलीधर भवार कल्याण : कल्याण-डोंबिवलीच्या वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा महणून हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाला आधारवाडीतील कच-याचा डोंगर आडवा आला आहे. कचरा हटवून रस्त्यासाठी जागा मोकळी करून द्या, अशी मागणी करून एमएमआरडीएने हा विषय पालिकेच्या गळ््यात घातला आहे. पण हा कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न पालिकेला पडला आहे.या प्रकल्पाच्या निविदा काढून दुर्गाडी ते टिटवाळा या पट्ट्यात कामाला सुरुवात झाली आहे. घनकचरा प्रकल्पाच्या जनसुनावणीत नागरिकांनी उंबर्डे, बारावे, मांडा येथील प्रकल्पांना तीव्र विरोध केल्याने आधारवाडीचा कचºयाचा डोंगर कुठे हलवायचा हा प्रश्न आहे. डम्पिंगची क्षमता संपूनही कल्याण-डोंबिवली पालिका आधारवाडीत कचरा टाकते आहे. या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादापुढे सुनावणी सुरु आहे. तीन वर्षात हे डम्पिंग हटवण्याचे प्रतिज्ञापत्र पालिकेने तेथे सादर केले आहे. आधारवाडीचे डम्पिंग बंद करण्यासाठी बारावे व उंबर्डे येथे अनुक्रमे २५० व ३५० मेट्रिक टनांचा घनकचरा प्रकल्प प्रस्तावित केला.त्यासाठी निविदा काढल्या. संबंधित कंत्राटदाराला काम सुरु करण्याचे आदेश दिले. पण जनसुनावणी न घेतल्याने त्याला लवादाने पर्यावरण ना हरकत दाखला दिलेला नाही. पण जनसुनावणीत नागरिकांनी तीव्र विरोध केल्याने तूर्त आधारवाडीतच कचरा टाकणे सुरू आहे. आधारवाडीतील कचºयावर प्रक्रिया करणारा कंत्राटदार नागरिकांच्या विरोधामुळे अनामत रकमेवर पाणी सोडून पळून गेला.12लाख मेट्रिक टनकचरा हटवणे गरजेचेआधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर सध्या १५ लाख घनमीटर मेट्रिक टन कचरा आहे. तेथे कचºयाचा २५ मीटरचा डोंगर आहे. या कचºयाच्या डोंगरात महापालिकेचे जुने एसटीपी गाडले गेलेले आहे. क्षमता संपूनही पालिका तेथे दररोज ६०० मेट्रिक टन कचरा टाकते आहे. एमएमआरडीने महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार रिंगरोड प्रकल्पाची निविदा काढून प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. दुर्गाडी ते गांधारे येथील काम सुुरू आहे. या मार्गात आधारवाडी डम्पिंगच्या कचºयाचा डोंगर आहे. त्यातील १२ लाख मेट्रिक टन कचरा दूर केल्याशिवाय हा मार्ग बांधणे कठीण आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका