ठाणे : ओमायक्रॉन आणि कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणो महानगरपालिका क्षेत्रत १ जानेवारीपासून नवे कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे लग्न समारंभासह कोणत्याही कार्यक्रमांना १०० ची मर्यादा ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांची उपस्थितीचे बंधन घातले आहे. सर्वच नियमांचे काटेकोरपणो पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.
या नव्या निर्बंधांमध्ये सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळे यांसाठीची उपस्थितीला मर्यादा आली आहे. यापूवीच्या निर्बंधांसह नवे निर्बंध कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केले आहेत. यामध्ये कोणत्याही बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या मैदानात पार पडणा:या लग्न समारंभांसाठी तसेच धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठीही ही मर्यादा ५० केली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रतील पर्यटनस्थळांवर, तलाव, क्र ीडांगणो यासारख्या ठिकाणी २४ डिसेंबरच्या आदेशानुसार लागू केलेल्या सर्व निर्बंधांसह जमावबंदी (१४४ सी.आर.पी.सी. ) लागू केले आहे. आदेशाची उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग नियंत्रण अधिनियम तसेच भारतीय दंड संहिता १८६० मधील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही महापौर म्हस्के यांनी म्हटले आहे.