शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

डहाणूत किनाऱ्याला रेती चोरीचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 11:14 PM

संडे अँकर । प्रशासन अपयशी : किनाºयालगतची गावे नामशेष होण्याची पर्यावरणप्रेमींना भीती

डहाणू/बोर्डी : जागतिक तापमान वाढीमुळे मुंबईसह लगतची काही शहरे ३१ वर्षांनी पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त झाल्यानंतर याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र डहाणू तालुक्यातील समुद्रातून अवैध रेती चोरीने किनारा पुढे सरकत असून वृक्ष उन्मळणे, जमिनीची धूप, शेती आणि वस्त्यांमध्ये भरतीचे पाणी शिरून होणारा ºहास रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. दरम्यान, भरमसाठ रेती उपशामुळे होणाºया किनाºयालगत गावांचे नुकसान ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामांआधी भोगावे लागत असल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीयस्तरावर ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न चर्चेला आल्यानंतर मुंबई आणि परिसरातील समुद्रकिनाºयालगतच्या समस्यांविषयी मतमतांतरे व्यक्त होत आहेत. पण, मुंबईनजीकच्या डहाणू तालुक्यातील चिंचणी ते बोर्डी या सुमारे ३३ कि.मी. लांबीच्या समुद्रात वाहने उतरवून अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक केली जाते. अनेक वर्षांपासून हा अवैध धंदा तेजीत सुरू आहे. अती उपशामुळे किनारा उथळ बनला असून रेतीचे साठे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भरतीच्या लाटा थेट किनाºयावर धडकून मोठ्या प्रमाणावर झीज झाल्याने धूप प्रतिबंधकाचे कार्य करणाºया सुरू बागांची एक रांग दरवर्षी उन्मळून जमीनदोस्त होत आहे. भरतीच्या पाण्याचा शिरकाव होऊन मर्यादावेल आणि अन्य गवत, औषधी वनस्पतींचा ºहास सुरू आहे. त्यामुळे किनाºयालगतच्या परिसंस्थेची मोठी हानी झाली आहे. येथे विणी हंगामात अंडी घालण्याकरिता येणाºया कासवांनी त्यामुळे कायमची पाठ फिरवली आहे. रेती वाहतुकीसाठी रात्री समुद्रात उतरणाºया वाहनांमुळे शांततेचा भंग होऊन विविध प्राण्यांच्या अधिवासाला धोका पोहचला असून त्यांच्या जाती नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.प्रतिवर्षी समुद्राच्या भरती रेषेत होणारी वाढ भितीदायक असून डहाणू - बोर्डी प्रमुख राज्य मार्गावर भरतीचे पाणी पोहोचल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर किनाºयालगतच्या जमिनीवर भराव घालून त्यावर उभ्या बांधकामांमुळे पावसाळ्यात पूरस्थिती येते तर कोलंबी प्रकल्पाच्या नावाखाली कांदळवन आणि खाजण क्षेत्राला धक्का पोहचून तटीय क्षेत्रातील शेतीत उधाणाच्या पाण्याचा शिरकाव होऊन नापिकता आणि वस्तीत पाणी शिरून घरांच्या नुकसानीच्या घटना वाढल्या आहेत.रेती चोरी थांबविण्याकरिता अर्ज, निवेदन, तक्र ारी आणि आंदोलनाच्या माध्यमातून भूमिपुत्र विरोध दर्शवीत आहेत. परंतु यातून मोठा आर्थिक फायदा मिळत असल्याने गावोगावी रेती माफिया दिसतात. त्यांचा प्रभाव वाढत असून त्याला होणारा विरोध संपविण्याचे संघटित कार्य हाती घेतले जाते. महसूल आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हे बंड मोडण्याचे प्रयत्न होतात. बंद पत्र प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी, फौजदारी गुन्हा, या गुन्ह्यात सापडलेले वाहन कायमचे जप्त व परवाना रद्द करणे आणि मोक्कासारख्या मोठ्या शिक्षेची तरतूद यासाठी करावी. अन्यथा ग्लोबल वॉर्मिंगपेक्षा रेती चोरीमुळे किनाºयालगतची गावे नामशेष होण्याची भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होत आहे.गावोगावी रेतीमाफियारेती चोरी थांबविण्याकरिता तक्र ारी आणि आंदोलनाच्या माध्यमातून भूमिपुत्र विरोध दर्शवित आहेत. परंतु यातून मोठा आर्थिक फायदा मिळत असल्याने गावोगावी रेती माफिया दिसतात. त्यांचा प्रभाव वाढत असून त्याला होणारा विरोध संपविण्याचे संघटित कार्य हाती घेतले जाते. महसूल आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाºयांकडून हे बंड मोडण्याचे प्रयत्न होतात. बंद पत्र प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी, फौजदारी गुन्हा, या गुन्ह्यात सापडलेले वाहन कायमचे जप्त व परवाना रद्द करणे आणि मोक्कासारख्या मोठ्या शिक्षेची तरतूद यासाठी करावी. अन्यथा रेती चोरीमुळे गावे नामशेष होतील.

टॅग्स :sandवाळूthaneठाणे