सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली जिल्ह्यातील इंग्रजी व मराठी माध्यमांसह अन्य भाषीक माध्यमांच्या शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासवर्गीय कुटुंबातील बालकांच्या प्रवेशासाठी २५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. या आरक्षिात जागांवर पहिल्या फेरीचे प्रवेश झाले. मात्र दुस-या फेरीच्या प्रवेशासाठी २० मेपर्यंत सोडत काढली जाणार होती. मात्र त्यास विलंब झाल्यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.केजी ते पहिलीच्या वर्गात बालकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातीलमराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणा-या ६५२ शाळांमध्ये यंदा १३ हजार ४०० प्रवेश आरटीई कायद्याखाली आरक्षित ठेवले आहेत. यापैकी आतापर्यंत तीन हजार ५९७ विद्यार्थ्यांचे पहिल्या फेरीत केजी ते पहिलीच्या वर्गात प्रवेश झाले आहे. उर्वरित प्रवेशासाठी दुस-या फेरीसाठी अजूनही सोडत काढण्यात आलेली नाही. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून संतापही व्यक्त होत आहे.आरटीईचे प्रवेश यंदाही उशिराने होत असल्यामुळे संबंधीत बालकांच्या पालकांना या उन्हाळ्याच्या सुटीत ही गावी किंवा अन्यत्र जाता आले नाही. कोणत्याही क्षेणी बालकाच्या प्रवेशासाठी बोलवण्यात येईल. त्यापेक्षा गावी किंवा अन्यत्र फिरायला जाणे पालकांनी टाळले आहेत. या दुसºया फेरीत संधीत मिळताच प्रवेश घेऊन पालक गांवी जाण्याच्या मानसिकतेत होते. परंतू जूनच्या पहिल्या आठवड्यात या दुस-या फिेरीसाठी सोडत काढण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे पालकांमध्ये तीर्व संताप ऐकायला मिळत आहे.जिल्ह्याभरात ११ हजार ७७६ प्रवेश पहिलीच्या वर्गात होतील. यातून पहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली असता यातील चार हजार ६२० बालकांचे पहिलीच्या वर्गात प्रवेश होणार होते. मात्र तीन हजार १९० बालकांचे प्रवेश झाले. पूर्व प्राथमिक म्हणजे केजीच्या वर्गातील प्रवेशासाठी एक हजार २७६ बालकांची निवड झाली होती त्यापैकी ७६७ बालकांचे संबंधीत शाळांमध्ये प्रवेश झाले. आता दुस-या फेरीच्या प्रवेशाना विलंब करून पालकांना वेठीस धरले जात धरले जात असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.* तीन किमी. लांबच्या शाळांमध्ये आता प्रवेश -पहिल्या सोडतमध्ये निवड झालेल्या बालकांचे प्रवेश एक किमी. अंतरावरील शाळांमध्ये झाले आहेत. आता दुसºया सोडतमध्ये निवड होणा-या बालकांचे प्रवेश १ ते तीन किमी.च्या अंतरावरील शाळांमध्ये होणार आहे.
आरटीईच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशाना विलंग;ठाणेच्या पालकांमध्ये तीव्र संताप
By सुरेश लोखंडे | Published: May 26, 2019 6:55 PM
सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली जिल्ह्यातील इंग्रजी व मराठी माध्यमांसह अन्य भाषीक ...
ठळक मुद्देपहिल्या फेरीत पाच हजार ८९६ बालकांची निवड झाली दुस-या फेरीच्या प्रवेश विलंब- पालकांमध्ये संतापतीन किमी. लांबच्या शाळांमध्ये आता प्रवेश