शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

अंबरनाथमध्ये रास्ता, रेल रोको, शहरातील व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 6:25 AM

प्रारंभी ‘रास्ता रोको’ आणि त्यानंतर काही काळ ‘रेल रोको’ करून संतप्त आंदोलकांनी भीमा-कोरेगाव येथील घटनेचा तीव्र निषेध केला. आंदोलनकर्ते सरकारच्या निषेधार्थ घोषणाही देत होते.

अंबरनाथ - प्रारंभी ‘रास्ता रोको’ आणि त्यानंतर काही काळ ‘रेल रोको’ करून संतप्त आंदोलकांनी भीमा-कोरेगाव येथील घटनेचा तीव्र निषेध केला. आंदोलनकर्ते सरकारच्या निषेधार्थ घोषणाही देत होते.बुधवारी सकाळी ९ वाजता आंदोलनाला सुरु वात झाली. शहरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, रिक्षा वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. रेल्वे स्थानकाजवळील शिवाजी चौकातून घोषणाबाजी करत आंदोलकांनी रेल्वेस्थानकात प्रवेश केला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही काही संतप्त आंदोलकांनी रेल्वे रु ळांवर उतरून घोषणाबाजी सुरू केली. संतप्त भीमसैनिकांनी सकाळी १० वा.च्या सुमारास फलाट क्र मांक-३ वर बदलापूरच्या दिशेने अंबरनाथकडे येणारी लोकल काही काळ अडवून धरली. नंतर, पोलिसांनी आंदोलकांना शांत केले व रेल्वेमार्गातून बाजूला काढल्यानंतर लोकल कल्याणच्या दिशेने मार्गस्थ झाली. यानंतर, आंदोलकांनी घोषणाबाजी करत नगरपालिका कार्यालयाजवळून जाणाºया कल्याण-बदलापूर रस्त्यावर ठाण मांडले व रस्ता रोखून धरला. यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती.आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिल्याने शाळांना सुटी देण्यात आली होती. रेल्वे फलाटांवरील उपाहारगृहे मध्यरात्रीनंतर बंद ठेवण्यात आली असल्याने बाहेरगावच्या गाड्यांमधील प्रवाशांचे व त्या उपाहारगृहांवर अवलंबून असलेल्यांचे हाल झाले. आजच्या बंदमध्ये शहरातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.श्यामदादा गायकवाड, कबीर गायकवाड, अजय जाधव, धनंजय सुर्वे, महेश तपासे, कमलाकर सूर्यवंशी, सत्यजित गायकवाड आदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.बंदच्या काळात अनुचित प्रकार घडू नये, म्हणून झोन-४ मधील पोलीस अधिकारी, कर्मचारी, राज्य राखीव पोलीस यांच्यासह मुख्यालयातून पोलिसांची एक हजारांची जादा कुमक मागवण्यात आली होती. आंदोलन शांततेत झाले.बदलापुरात आंदोलकांचा राडाबदलापूर : बुधवारच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये महिला पोलीस कर्मचारी राजश्री नवाळे जखमी झाल्याने पोलिसांनी मोर्चेकºयांवर सौम्य लाठीहल्ला केला. बंदचे परिणाम पहाटेपासूनच दिसायला सुरुवात झाली होती.बदलापुरात सकाळी ९ वा.च्या सुमारास पश्चिमेकडील उड्डाणपुलाजवळ रिक्षा रोखणाºया कार्यकर्त्यांना थोपवण्याचा प्रयत्न करत असताना नवाळे या महिला पोलीस जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांच्यावर हल्ला करणाºया चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, आंदोलकांनी पश्चिमेतील सहकार हॉटेलसमोर गोंधळ घालत कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी केल्याने नाइलाजास्तव त्या चार कार्यकर्त्यांना सोडण्यात आले. तत्पूर्वी पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी सौम्य लाठीहल्ला केला. त्यामध्ये काही कार्यकर्ते जखमी झाले. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी केली. पश्चिमेतून निघालेला मोर्चा पूर्वेतून घोरपडे चौकातून पुन्हा पश्चिमेत दाखल झाला, त्या वेळी उड्डाणपुलावर मोर्चेकºयांनी ठिय्या मांडला.दरम्यान, कर्जत महामार्ग आंदोलनामुळे तासभर ठप्प होता. परगावातून येणारी वाहने, ट्रक यांना त्याचा मोठा फटका बसला. बंद आणि मोर्चाचे वृत्तांकन करत असलेल्या प्रसिद्धिमाध्यमाच्या प्रतिनिधींनाही कात्रप येथे मोर्चेकºयांनी धक्काबुक्की केली. यामुळे मोर्चेकरी व पत्रकार यांच्या वादाचा प्रसंग निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.सलग दोन दिवस दलित संघटनांनी शहर बंद केल्याने नागरिक, चाकरमानी आणि विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागला. रिक्षा, बस, खाजगी वाहने जबरदस्तीने बंद केली जात असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण होते. या बंदमुळे महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. एरवी वाहनांनी गजबजणारे रस्ते बंदमुळे ओस पडलेले होते. वाहतूकही तुरळक प्रमाणात सुरू असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंद