शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

उद्योजकांनी दोन लाख खर्चून तयार केला रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 12:33 AM

एमआयडीसीतील खराब रस्त्यांमुळे अवजड वाहने रस्त्यांवर अडकून पडतात, अनेकदा नादुरुस्तही होतात.

अनिकेत घमंडी डोंबिवली : एमआयडीसीतील खराब रस्त्यांमुळे अवजड वाहने रस्त्यांवर अडकून पडतात, अनेकदा नादुरुस्तही होतात. अपघातांचीही भीती असते. त्याचबरोबर धुळीमुळे कामगारांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत असल्याने ते गैरहजर राहतात. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. शिवाय, महापालिका आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत लक्ष वेधूनही काहीच फरक न पडल्याने एमआयडीसी फेज-२ मधील सहा उद्योजकांनी एकत्र येत त्यांच्या प्रवेशद्वारांसमोरील रस्ता स्वखर्चाने तयार करण्यास सुरुवात केली आहे.कारखानदारांच्या ‘कामा’ संस्थेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी ही माहिती दिली. रस्त्याच्या डागडुजीसाठी सोनारपाडा, टेम्पोनाकानजीकच्या एमआयडीसी फेज २ मधील ओमेगा फाइन, डेक्कन, अमूदन केमिकल्स, सप्तवरणा केमिकल्स, लिंक बल्क केमिकल्स, पल्लवी एंटरप्राइज या कंपन्यांच्या उद्योजकांनी पुढाकार घेतल्याचे ते म्हणाले. खराब रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी ‘कामा’ने एमआयडीसी, महापालिकेकडे पत्रव्यवहार केला. पण, २०१५ पासून आतापर्यंत टोलवाटोलवी करण्यात यंत्रणांनी वेळ मारून नेली. रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे उद्योजक अक्षरश: मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे अखेरीस उद्योजकांनी स्वर्चाने रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला. दोन लाख रुपये खर्चून १५० मीटर लांब व सात मीटर रुंद अशा रस्त्यावर लहानमोठी खडी टाकून रस्ता तयार करण्याचे काम त्यांनी सुरू केल्याचे सोनी म्हणाले. यंत्रणांच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात प्रथमच लघुउद्योजकांनी अशा प्रकारे नवीन पायंडा पाडला असावा, असे ते म्हणाले. केडीएमसीने एलबीटी, स्टोअरेज लायसन्स फी आणि वाढीव प्रॉपर्टी टॅक्स, अशी नानाविध करवसुलीची सक्ती केली. परंतु, सुविधा पुरवण्याच्या नावाने मात्र बोंब आहे. अनेक वर्षांपासून औद्योगिक क्षेत्रातील रस्ते हा एक चर्चेचा विषय आहे. पण, यंत्रणा मात्र काही करत नाहीत, त्यामुळे उद्योग आणि उद्योजक यात भरडले जात आहेत. निदान यापुढे तरी संबंधित यंत्रणांनी त्यांची जबाबदारी ओळखून त्वरित उर्वरित रस्त्यांची दर्जेदार कामे हाती घ्यावीत आणि उद्योजक, कामगार, रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा सोनी यांनी व्यक्त केली. दरम्यान, स्वखर्चाने रस्ता तयार करणाºया उद्योजकांचे अन्य उद्योजकांकडून कौतुक होत आहे. यासंदर्भात महापालिका वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, एमआयडीसीने त्या भागातील रस्त्यांवर गटारांची कामे पूर्ण केलेली नाहीत. तसेच रस्ते अजून महापालिकेला हस्तांतरित केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले.।२७ गावे केडीएमसीत २०१५ मध्ये समाविष्ट झाली आहेत. त्यामुळे एमआयडीसी भागातील रस्त्यांची जबाबदारी ही महापालिकेचीच आहे. रहिवासी आणि उद्योजकांकडून सगळ्या प्रकारचा कर तेच वसूल करत आहेत. तसेच एमआयडीसीच्या माध्यमातून ज्या भागांत गटारांची कामे झाली आहेत, तेथील रस्त्यांच्या कामांचा महापालिका कधी शुभारंभ करणार, हे आम्ही कसे सांगणार, ते त्यांनी ठरवावे.- संजय ननावरे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी