उल्हासनगर : कॅम्प नं २ मधील प्रभाग क्र ५ मध्ये भाजप नगरसेविका गीता साधनानी यांच्या नगरसेवक निधीतून रामजपो आश्रम ते मूनलाइट अपार्टमेंटदरम्यान काँक्रिटचा रस्ता बनविणे सुरू आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने दुरुस्तीची मागणी साधवानी यांनी महापालिकेकडे लावून धरली होती.
–-----–---------------------
तडीपार गुंडास अटक
उल्हासनगर : शहाड फाटक परिसरात राहणाऱ्या रूपेश वावळे याला पोलिसांनी ठाणे जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रायगड जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. रात्री एकच्या दरम्यान शहाड फाटक परिसरात पोलिसांना दिसला. त्याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------------
कार बुकिंगच्या नावाखाली फसवणूक
उल्हासनगर : कार बुक करण्यासाठी राजेश तलरेजा यांनी २ एप्रिल ते ६ जून २०१९ दरम्यान सुरुवातीला १ लाख व नंतर आरटीजीएसद्वारे ४ लाख ९० हजार असे एकूण ५ लाख ९० हजार रुपये अमित माखिजा याला दिले. दरम्यान कार बुकिंग केले नाही असे समजल्यावर पैशाची मागणी तलरेजा यांनी केल्यावर २५ हजार माखिजा याने दिले. मात्र ५ लाख ६५ हजार रक्कम अद्याप परत केली नसल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार हिललाईन पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी माखिजा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.