शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
3
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
4
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
5
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
6
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
7
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
8
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
9
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
10
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
11
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
12
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
13
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
14
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
15
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
16
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
17
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
18
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

गायमुख घाटातील रस्त्याच्या कामामुळे ठाण्यात वाहतूक कोंडीचा फटका

By जितेंद्र कालेकर | Published: June 06, 2024 6:34 PM

ठाणे ते बोरीवली आणि बोरीवली ते ठाणे मार्गावर वाहनांचा खोळंबा: पाच मिनिटांसाठी दीड ते दोन तास

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्याकडून घोडबंदर रोडकडे जाणाºया मार्गावर गायमुख घाटात ७०० मीटर रस्त्याच्या मजबूतीकरण्याचे काम २४ मे पासून सुरु केले आहे. याच कामामुळे घोडबंदर मार्गांवर गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. बोरिवली कडे जाण्याच्या तसेच ठाण्याकडे येण्याच्या अशा दोन्ही मार्गांवर ही वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशाना मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.

विशेष म्हणजे वाहतूक शाखेने या मार्गावर या कामामुळे आधीच मोठया वाहनाची वाहतूक बंद केली आह. तरीही काही वाहने या मार्गाने जात असल्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडत असल्याचेही पहायला मिळाले.

गायमुख घाट २४ मे २०२४ पासून अवघड वाहनांसाठी बंद केला आहे. मुंबई अहमदाबाद ला जोडणाºया घोडबंदर रोडवर गायमुख घाट रस्त्याचे डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेतले आहे. या महामार्गावरील ७०० मीटर रस्त्याचे सॉईल स्टॅबिलायझेशन करून मजबूतीकरण केले जात आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मार्गावरील वाहतूकीमध्ये बदल केले असून २४ मे ते ७ जूनपर्यंत या मार्गावर मोठया मालवाहू वाहनांना बंदी घातली आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मोठया वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहनही वाहतूक शाखेने केले आहे.

अवघ्या पाच मिनिटांसाठी दीड तास-

गुरुवारी झालेल्या कोंडीमुळे अवघ्या पाच ते दहा मिनिटांच्या अंतरासाठी चालकांना दीड ते दोन तासाचा कालावधी लागत होता. दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी सकाळी बोरिवलीकडे जाण्याºया आणि ठाण्याकडे येणाºया अशा दोन्ही मार्गांवर ही वाहतूक कोंडी झाली होती.दुपारी एक वाजेपर्यंत ही कोंडी कायम होती. महत्वाचे म्हणजे रात्रीच्या वेळीही या वाहतूक कोंडीला चालकांना सामोरे जावे लागले. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक मदतनीस आणि वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. बोरिवलीच्या दिशेने जाणाºया मार्गांवर ठाण्यात कासारवडवली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक वाहन चालकांनी त्यांची वाहने रस्त्यावर बंद केल्याने या वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडली.

टॅग्स :thaneठाणे