शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अगोदरच खड्डे असलेले रस्ते केबलसाठी खोदणार; जि.प.चा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 11:27 PM

कंपनीकडे नेट कनेक्शनची मागणी

सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागातील रस्ते यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खराब झाले असतानाच आता ठिकठिकाणच्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूने जिओ इन्फोच्या केबल टाकण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून मंजुरीसाठी रेटला जात आहे. मात्र आधीच खराब झालेले रस्ते केबल टाकण्याकरिता खोदून ठेवल्यास रस्त्यांच्या दुरवस्थेत भर पडेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे असून या प्रस्तावाच्या विरोधात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

या ग्रामीण रस्त्यांवरून गावखेड्यातील रूग्णांना दवाखान्यात नेणेही जोखमीचे झाले आहे. त्यात या जिओ केबलसाठी रस्ते खोदले जाणार आहेत. यामुळे अगोदरच खड्डे पडलेले रस्ते सुधारणे तर दूरच राहिले खराब होण्याची शक्यता आहे. कल्याण, अंबरनाथ, मुरबाड तालुक्यातील तब्बल चार रस्ते खोदून त्यांच्या दोन्ही बाजुला या केबल टाकल्या जाणार आहेत. एखाद्या कंपनीच्या फायद्यासाठी ग्रामीण भागातील रस्ते खोदण्यास जिल्हा परिषदेच्या सदस्यांंनी विरोध केला आहे. मात्र कंपनीच्या सततच्या रेट्यामुळे बांधकाम विभाग परवानगी देण्याच्या विचारात आहे.

या रस्त्यांची डागडुजी करण्याचा खर्च केबल टाकल्यावर कंपनीने करावा, अशी अट प्रशासनाकडून घालण्यात आली आहे. जिओ कंपनीने जिल्हा परिषदेच्या सर्व शासकीय कार्यालयांना दोन एमबीपीएस नेट कनेक्शन विनाशुल्क देण्याची अट कंपनीला घातलेली आहे. या मोफत नेटसेवेची अट कंपनी मान्य करील, असे संकेत आहेत. पण केबलच्या कामांसाठी रस्ते खोदण्याचा फटका ग्रामस्थानाच बसणार आहे. मुरबाड तालुक्यातील शिवळे तुळई देहरीे हा रस्ता तब्बल ७०० मीटर बाधीत होणार आहे. त्याच्या दुरूस्तीसाठी सहा लाख ८२ हजारांची मागणी जिल्हा परिषदेने केली आहे.