लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : जमीन आणि झाड तोडण्याच्या वादातून आयरे गावातील विक्र ांत बाळू ऊर्फ केणे यांची मंगळवारी परवानाधारी पिस्तूलमधून गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पळून जाताना आरोपी मंगेश भगत, श्रीराम भगत व अन्य काही जणांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी गुन्ह्यात वापरलेली गाडी अर्ध्या रस्त्यात बदलल्याचे तसेच लोकेशन ट्रेस होऊ नये, यासाठी मोबाइल स्वीच आॅफ करणे, ओळख लपवणे, वेशभूषा बदलणे यासारख्या अनेक शकली लढवल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा माग काढताना पोलिसांना अडथळे येत आहेत.विक्रांत यांची हत्या केल्यानंतर आरोपींनी पळून जाण्यासाठी दोन गाड्या व दुचाकी वाहने वापरली होती. मात्र, पोलिसांनी आपल्याला पकडू नये, यासाठी आरोपींनी काही अंतरावरच दुसऱ्या गाड्या मागवून आधीच्या गाड्या बदलल्या. पोलिसांनी त्यांच्या संभाव्य मार्गातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ही बाब लक्षात आली. त्या दृष्टीने पोलिसांनी वांगणी आणि कोपरखैरणे येथे दोन पोलीस पथके त्यांच्या मागावर रवाना केली होती. त्यापूर्वी आरोपींनी तेथून काढता पाय घेतला. दरम्यान, या आरोपींच्या शोधासाठी रामनगर पोलिसांनी विविध ठिकाणी सहा पथके पाठवली आहेत. तसेच गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण युनिट ३ चे पथकही स्वतंत्रपणे आरोपींचा शोध घेत आहे. चौधरी प्रकरणातील आरोपींची रवानगी तुरुंगातचोळे गावतील कंत्राटदार किशोर चौधरी आणि महिमादास विल्सन यांची गोळ््या झाडून हत्या करणारे दिलीप भोईर, शंकर भोईर, सुरज भोईर, चिराग भोईर यांच्यासह ११ आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांची रवानगी सध्या कारागृहात केल्याचे तपास अधिकारी विजयसिंग पवार यांनी सांगितले.गोळीबारातील आरोपींच्या शोधासाठी पथके रवानाआडीवली गावात मंगळवारी रात्री हळदी समारंभात नाचताना झालेल्या वादातून गाड्यांची तोडफोड तसेच हवेत गोळीबार करण्यात आला होता. या घटनेतील आरोपी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.हळदीचा कार्यक्रम सुरू असताना मंगळवारी नाचताना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर राजेंद्र भाने यांच्या घरासमोर काही तरुणांनी हवेत गोळीबार केला. तसेच चारचाकी व दुचाकी गाड्यांची तोडफोड केली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी आकाश भोईर, परशुराम साळवी यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर फरारी झाल्या आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे सहायक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे यांनी सांगितले.
आरोपींनी रस्त्यात बदलल्या गाड्या
By admin | Published: June 02, 2017 5:17 AM