शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

वाहतूककोंडीवर घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 3:30 AM

दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या ठाण्याच्या वाहतूकप्रश्नावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गुरुवारी जोरदार चर्चा झाली. शहराच्या विस्कळीत वाहतुकीसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या ठाण्याच्या वाहतूकप्रश्नावर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गुरुवारी जोरदार चर्चा झाली. शहराच्या विस्कळीत वाहतुकीसाठी महापालिकादेखील जबाबदार असल्याचे नगरसेवकांनी सोदाहरण स्पष्ट केल्यानंतर या विषयावर पालकमंत्री, महापालिका आणि वाहतूक शाखेची संयुक्त बैठक लवकरच घेण्याचा निर्णय महासभेने घेतला.वाहतूककोंडीबाबत महासभेत मांडलेल्या लक्षवेधीदरम्यान काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी महापालिकेच्या विविध विभागांमुळे वाहतूकव्यवस्था आणखी विस्कळीत होत असल्याचा आरोप केला. विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना महापालिकेने वाहतूकव्यवस्थेचा मुद्दाही विचारात घेतला पाहिजे. कोणत्याही बांधकामास मंजुरी देताना तिथे पुरेशा पार्किंग व्यवस्थेची खातरजमा महापालिकेने करावी, अशी सूचना त्यांनी केली. आर मॉलची पार्किंग सर्व्हिस रोडवर केली जाते. घोडबंदर ते कोपरी किंवा मुंब्रा ते कळवा यासारख्या वर्दळीच्या रस्त्यांना पर्यायी रस्तेच नसल्याने वाहनांची गर्दी वाढते. बांधकामांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांना वर्दळीच्या वेळी मज्जाव केल्यास वाहतूक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते, असे मतही त्यांनी मांडले. रेतीबंदर भागात महापालिकेने चौपाटीऐवजी वर हँगिंग गार्डन आणि खाली ट्रक टर्मिनस उभारले, तर त्याचाही फायदा वाहतूकव्यवस्थेस होऊ शकतो. लालबहादूर शास्त्री रोडवर जागोजागी अनावश्यक यू टर्न दिले आहेत, त्यामुळेही वाहतूक विस्कळीत होते. तीन पेट्रोलपंप चौक आणि खोपट रोडवर महानगर गॅसपंपामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याकडे नारायण पवार यांनी लक्ष वेधले. मुंब्रा प्रभागात अतिक्रमण फोफावले असून ते हटवल्यास वाहतुकीस मदत होईल, असे शानू पठाण यांनी सुचवले. एका हृदयरोग्याला रेतीबंदर येथून खारेगाव येथील सफायर हॉस्पिटलमध्ये पोहोचवताना वाहतुकीमुळे झालेला विलंब सभागृहामध्ये मांडताना अनिता केणी यांनी ठाणेकर तुझा प्रशासनावर भरवसा नाय काय, हे विडंबनगीत म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. वाहतूककोंडी हा कोणत्या एका पक्षाचा प्रश्न नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी सेवा प्रतिष्ठान तज्ज्ञांच्या मदतीने प्रयत्न करीत आहे. याकामी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सुचवले.‘लोकमत’च्या बातमीवर चर्चालोकपुरम येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह दुरुस्तीअभावी वर्षभरापासून बंद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी प्रकाशित केले. नगरसेवक सुहास देसाई यांनी सभेत या बातमीचा उल्लेख केला. महत्त्वाच्या कामांमध्ये राजकारण करण्यात अर्थ नाही. अशा प्रकारच्या समस्यांसाठी वृत्तपत्र राजकारण्यांना जबाबदार धरतात. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.शिवसेनेला घरचा आहेरवाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. अशा अनेक गंभीर प्रश्नांवर महासभेमध्ये चर्चा केली जाते. परंतु, यातून काय साध्य होते, असा प्रश्न माजी महापौर अशोक वैती यांनी उपस्थित करून सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर दिला. सत्ताधारी पक्षाच्या ज्येष्ठ सदस्याला अशा प्रकारे खंत व्यक्त करावी लागते, हे दुर्दैव असल्याचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील म्हणाले. आगीत तेल ओतण्याची त्यांची चाल हेरून नरेश म्हस्के यांनी शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी विरोधी पक्षानेही समर्थ साथ द्यावी, असा टोला लगावला.