डोंबिवली : शहरात ठिकठिकाणी आरटीओचे नियम धाब्यावर बसवून शेअरपद्धतीसाठी पहिल्या टप्प्याला आठ रुपयांऐवजी १० रुपये भाडे आकारले जात आहे. एखाद्या प्रवाशाने आवाज उठवल्यास त्याला दमदाटी केली जाते. गांधीनगर, पी अॅण्ड टी कॉलनी येथेही सर्रास १० रुपयेच आकारले जात असल्याचे महिला प्रवाशांनी सांगितले. तेथून रेल्वेस्थानकाच्या दिशेने येताना अथवा स्थानकाकडे जाताना १० रुपये आकारण्यात येत आहेत. याकडे आरटीओ अधिकारी बघ्याची भूमिका घेत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.शहरात सर्वच ठिकाणी पहिल्या टप्प्यासाठी १० रुपयेच आकारले जात आहेत. त्याविरोधात कोणी आवाज उठवल्यास तो एकटा पडतो. त्यामुळे अखेर १० रुपये द्यावेच लागत असल्याचे लता अरगडे यांनी सांगितले. गांधीनगरमध्ये काही रिक्षाचालक आठ रुपये घेत होते. तेही आता १० रुपये घेत आहेत. आरटीओ, वाहतूक पोलीस अभावानेच शहरात कारवाई करतात. त्यामुळेच रिक्षाचालकांची मुजोरी वाढली आहे, असे त्या म्हणाल्या. पंधरवड्यापूर्वी आरटीओ अधिकाऱ्यांनी वाहतूक नियंत्रण अधिकाºयांसमवेत दोन दिवस डोंबिवली पश्चिमेला येऊन थातूरमातूर कारवाई केली होती. त्यानंतर पूर्वेतही कारवाईसाठी येणार असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात आठवडा उलटूनही कारवाईचा काहीच पत्ता नाही, असे वाहतूक नियंत्रण पोलीस सूत्रांनी सांगितले.माझ्या कार्यालयातील सहकाºयांना मी डोंबिवली पूर्वेतील विविध भागांमध्ये फिरून दोषी आढळणाºया रिक्षाचलाकांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.- संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण
डोंबिवलीत रिक्षाचालकांकडून लूट सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:25 PM