ठाणे : नौपाड्यात मॅटर्निटी होम आणि आरोग्य केंद्रासाठी आरक्षित असलेल्या जागेवर रात्रनिवारा सुरू करण्याचा प्रशासनाचा घाट भाजपासह शिवसेनेने हाणून पाडला होता. परंतु, आता येथील जागा द ऊर्जा एनर्जी बचत गटास देण्याचे घाटत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर येणार आहे. त्यातही विरोध करणाऱ्या भाजपामधील एका नगरसेविकेचाच हा बचत गट असल्याने पालिका सदस्य स्वत: लाभार्थी होऊ शकतो का, असा प्रश्न यानिमित्ताने करण्यात येत आहे.कोपरी येथे निवारा केंद्र उभारल्यानंतर नौपाड्यातून ते हलवण्यात येणार होते. परंतु, महासभेत या मुद्यावर चांगलेच वातवरण तापले होते. नौपाड्यातील भाजपाच्या सर्वच नगरसेवकांनी महापालिकेच्या रात्रनिवारा केंद्राला विरोध केला होता. मॅटर्निटी होमसाठी येथे जागा आरक्षित असल्याने रात्रनिवारा केंद्र इतरत्र कुठेही करा, असे खडेबोल त्यांनी प्रशासनाला सुनावले होते. शिवसेनेनेसुद्धा यासंदर्भात विरोध करून नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी जे आरक्षण आहे, तेच विकसित करावे, असे स्पष्ट केले होते.एकूणच रात्रनिवारा केंद्राचे वावडे असणाºया भाजपाने मॅटर्निटी केंद्र सुरूकरण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. प्रशासनाने रात्रनिवारा केंद्राचे प्रकरण गुंडाळले असताना आता त्या ठिकाणी द ऊर्जा एनर्जी बचत गटासाठी हे केंद्र देण्याचा प्रस्ताव पटलावर आणला आहे. या प्रस्तावानुसार पहिल्या मजल्यावरील लिफ्टसमोरील अभ्यासिका व दुसरा मजला संपूर्ण सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी देण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे महासभेत आता लोकप्रतिनिधी काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे एकीकडे रात्रनिवारा केंद्राला विरोध करायचा आणि दुसरीकडे बचत गटासाठी ही जागा घशात घालण्याचा भाजपाचा घाट सुरूअसल्याने ठाणेकरांत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.सदरचा महिला बचत गट हा भाजपाच्याच एका नगरसेविकेचा असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, एक नगरसेवक अशा प्रकारे लाभार्थी होऊ शकतो का, असा सवाल आता येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.मॅटर्निटी होमसाठी या जागेचे आरक्षण आहे. परंतु, त्याठिकाणी अद्यापही त्यासाठी काहीच हालचाली प्रशासनाकडून झालेल्या नाहीत. प्रशासन आता त्याठिकाणी ज्येष्ठांसाठी आरोग्य केंद्र आणि इतर सुविधा देत आहे. त्यामुळे बचत गटासाठी जागा दिली जात असेल, तर त्यासाठी माझे सहकार्य असेल.- मृणाल पेंडसे, नगरसेविका, भाजपासदरचा प्रस्ताव नेमका काय आहे, तो तपासावा लागणार आहे. त्यानंतरच त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार आहे.- सुनेश जोशी, नगरसेवक, भाजपाप्रशासनाने या जागेविषयी एक ठाम भूमिका घ्यावी. रात्रनिवाºयाला आम्हीच विरोध केला होता. त्यामुळे तेथे आता मॅटर्निटी केंद्रच सुरू करावे.- प्रतिभा मढवी, नगरसेविका, भाजपासदरची जागा ही मॅटर्निटी होमसाठी असावी, अशी मागणी आम्हीच लावून धरली होती. त्यामुळे इतर कोणत्याही कारणासाठी ती जागा देण्यात येऊ नये.- संजय वाघुले,नगरसेवक, भाजपा
मॅटर्निटी होमची जागा भाजपाच्या घशात?, प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2019 12:30 AM