शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
3
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
4
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
5
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
6
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
7
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
8
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
9
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
10
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
11
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
12
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
13
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
14
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
15
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
16
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
17
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
18
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
19
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
20
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या

अनधिकृत बांधकामांमागील हितसंबंध हीच मूळ समस्या

By संदीप प्रधान | Updated: December 16, 2024 09:35 IST

ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे गेली कित्येक वर्षांपासून पेव फुटले आहे.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

ठाणे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांचे गेली कित्येक वर्षांपासून पेव फुटले आहे. या विरोधातील कारवाई ही थातुरमातुर अशीच आहे. अनधिकृत बांधकाम करणारे माफिया, सत्ताधारी नेते आणि महापालिकेचे अधिकारी यांचे हितसंबंध जोपर्यंत घट्ट आहेत, घरांची गरज असलेल्यांची संख्या जास्त आणि उपलब्ध परवडणारी स्वस्त घरे कमी असे व्यस्त प्रमाण जोपर्यंत आहे तोपर्यंत अनधिकृत बांधकामांची शृखंला पूर्णपणे तोडणे अशक्य आहे. न्यायालयाने फटकारले की, महापालिका तात्पुरती कारवाई करते. पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ या न्यायाने अनधिकृत बांधकामांचे इमले चढतच जातात.

निवारा ही मूलभूत गरज आहे. हजारो लोक रस्त्यावर वास्तव्य करतात. ज्यांना रस्त्यावर राहणे शक्य नाही ते अनधिकृत बांधकामात आसरा घेतात. एकेकाळी अर्बन लँड सिलिंग ॲक्टच्या भीतीने जमीन मालकांनी आपल्या जमिनींवर बेकायदा चाळी, इमारती उभ्या केल्या. मुंबई व उपनगरात झोपड्या उभ्या राहण्याचे ते एक प्रमुख कारण आहे. ठाणे महापालिका हद्दीत मुंब्रा, कळवा या परिसरात अनेक शासकीय भूखंडावर अतिक्रमण झाले.  दिव्यात खारफुटी जाळून रातोरात इमारती उभ्या राहिल्या. घोडबंदर रोड येथेही बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. देशाचा समन्यायी विकास न झाल्याने उत्तरेकडील अविकसित राज्यातून रोजगारासाठी लोंढे येतात. अनेकांना रोजगार मुंबईत मिळाला तरी वास्तव्याकरिता ते पूर्व वा पश्चिम उपनगरात आसरा घेतात. त्यामुळे वसई-विरार किंवा ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरात घरांची मागणी वाढली. याचा गैरफायदा भूमाफियांनी उचलला. खासगी, सरकारी अशा सर्वच भूखंडांवर इमारती उभ्या केल्या. 

दंगलीनंतर मुंब्र्यात दाटीवाटी

मुंबईत १९९२-९३ मध्ये दंगल झाली. त्यानंतर मुंबईतून मोठ्या प्रमाणावर मुंब्रा परिसरात स्थलांतर झाले. मुंब्र्याच्या डोंगराच्या पायथ्यापासून वरवरपर्यंत हजारो झोपड्या उभ्या राहिल्या. मुंब्र्यातील या डोंगरावर उभ्या राहिलेल्या झोपड्यांतून होणाऱ्या पाण्याच्या वापरामुळे पारसिकचा बोगदा धोकादायक झाला. एकेकाळी जलद लोकलची वाहतूक या बोगद्यातून व्हायची. कालांतराने येथील वाहतुकीवर वेगमर्यादा घातल्याने लोकल विलंब होऊ लागला. आता पारसिक बोगद्यातून वाहतूक होत नाही. केवळ मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांचीच वाहतूक होते.

अतिवृष्टीने दिवा बुडाले

मुंबई व उपनगरात २६ जुलै २००५ रोजी ऐतिहासिक पर्जन्यवृष्टी झाली होती. एका दिवसात ९०० ते ११०० मि.मी. पाऊस झाला होता. दिव्यात याच काळात असंख्य अनधिकृत बांधकामे उभी राहिली होती. मुसळधार पावसामुळे दिव्यातील इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अर्थात त्यानंतरही येथील मँनग्रोव्हज जाळून अनधिकृत बांधकामे उभी करण्याचा सपाटा भूमाफियांनी सुरू केला. ठाणे, डोंबिवली, कल्याण येथे घर खरेदी करणे परवडत नाही ते लोक दिव्यात १२ ते २० लाखांत घर खरेदी करतात.

ठाणे महापालिकेने २०१९ ते २०२४ या कालावधीत नौपाडा-कोपरी, वागळे, लोकमान्य-सावरकर, माजिवडा-मानपाडा, उथळसर, कळवा, मुंब्रा, दिवा प्रभागात मिळून ५५१० अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. ठाण्यात लक्षावधी अनधिकृत बांधकामे उभी असताना सहा वर्षांत झालेली कारवाई किती तुटपुंजी आहे हेच ही आकडेवारी दाखवते.

 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका