ठाणे : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात महापूर आल्याने तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेटने ‘पुस्तक दान’ मोहीम सुरू केली आहे.
पूरग्रस्तांना शहरातील विविध ठिकाणांहून जीवनावश्यक वस्तूंच्या मदत जात आहे, पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शैक्षणिक साहित्य-पुस्तके आणि स्टेशनरी वाहून गेल्याने किंवा खराब झाल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम झाला आहे. या पूरग्रस्त विद्यार्थ्यांना परत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एक छोटासा प्रयत्न सुरू केल्याचे प्रोजेक्ट प्रमुख मायरा हजारे हिने सांगितले. या पुस्तक दान मोहिमेत इयत्ता पाचवी ते इयत्ता १२वी पर्यंतची पुस्तके गोळा केली जाणार आहेत. त्याचबरोबर, इतर शैक्षणिक साहित्यही स्वीकारले जाणार आहे. इच्छुकांनी या चांगल्या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन मायराने केले आहे.
...........
वाचली