शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

नव्या इलेक्ट्रिक बसचा मार्ग खडतरच, चार्जिंग स्टेशनसह विजेचा खर्च भागविण्यासाठी अनुदानाचा आधार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 11:49 PM

electric bus : ठाण्यातील प्रदूषणात घट करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने १०० इलेक्ट्रिक बसेस पीपीपी तत्त्वावर घेण्याचे निश्चित केले होते.

ठाणे:  ठाणे  परिवहनच्या सेवेत एकमेव असलेली इलेक्ट्रिक बस सध्या बंद अवस्थेत आहे. उर्वरित ९९ बस सध्या तरी सेवेत दाखल होणार नसल्याचेच दिसत होते, परंतु आता परिवहनने एमएमआरडीएकडून १०० इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्या सेवेत आल्या, तरी त्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशनसह विजेचा खर्च हा परिवहनला परवडणारा नाही. त्यामुळे हा खर्च भागविण्यासाठी सबसिडीचा आधार घ्यावा लागणार आहे, परंतु तो मिळणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. केंद्राने तो दिला नाही, तर मात्र या बसची अवस्थाही पहिल्या बसप्रमाणेच होईल, अशी शक्यता आतापासूनच वर्तविली जात आहे. ठाण्यातील प्रदूषणात घट करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने १०० इलेक्ट्रिक बसेस पीपीपी तत्त्वावर घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार, चार वर्षांपूर्वी या संदर्भातील प्रस्ताव मंजूर केला होता.  पार्किंग, बस थांबा, चार्जिंग स्टेशन यासाठी लागणारी जागा ठेकेदार कंपनीला महापालिका  विनामूल्य देणार होती, तर  तिकिटापासून मिळणारे सर्व उत्पन्न ठेकेदार कंपनीला मिळणार होते.  मात्र,  गेल्या चार  वर्षांपासून या बसची वाट ठाणेकर पहात आहेत.  जी एक इलेक्ट्रिक बस ठाण्यातील रस्त्यावर धावत आहे, तिच्या बॅटरी काही महिन्यांतच खराब  झाल्यामुळे, नव्याने उच्च दर्जाच्या बॅटरी तिला बसवाव्या लागल्या, तर उर्वरित बसच्या बॅटरी बदलण्यात येत असल्याने, इतर बसचे आगमन लांबले असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, एकाच वेळी सर्व बस आल्या, तर त्यांच्यासाठी पुरेशी चार्जिंग स्टेशन नसल्यामुळेच त्या येऊ शकल्या नाहीत. असे असताना आता ठेकेदार कंपनीनेच यातून काढता पाय घेतल्याने, आहे ती एक बसही धूळखात आहे.

बस चार्जिंगचा सौदा पडतो महागात

ठाणे: परिवहन सभापती विलास जोशी यांनी एमएमआरडीएकडून १०० नव्या इलेक्ट्रिक बस घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, त्यासाठी परिवहनला स्वत:चे चार्जिंग स्टेशन उभारावे लागणार आहे. सुरुवातीला चार्जिंग केल्यानंतर एक बस २४० किमी चालते असे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात एकदा चार्जिंग केल्यानंतर एक बस १६० ते १७० किमी बस चालते. एका बसची बॅटरी चार्ज करण्यासाठी ७ कि.वॅट वीज लागते आणि बॅटरी चार्ज करण्यासाठी ११ रुपये प्रति युनिट दर असल्याने हा सौदा महागात पडणार आहे. मुंबईत बेस्टकडून इलेक्ट्रिक बसेसच्या बॅटऱ्या चार्ज करण्यासाठी स्वस्त दरात वीज दिली जाते. ठाणे महापालिकेला तशी सवलत मिळत नाही. मुंबई-पुण्यात केंद्राने इलेक्टिक बससाठी ६० टक्के सबसिडी दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणे