ठाणे: मुंबई विद्यापिठाच्या ठाणे उपकेंद्रासाठी पालिका आयुक्तांनी 20 कोटीदेण्याची घोषणा केलेली असताना ठाणे महापौरांनी त्यास विरोध केला आहे. मात्र, आता त्यांच्याच स्वपक्षाच्या आमदाराने संस्कृती आर्टस् फेस्टिव्हलसाठी उपवन तलावात तयार करण्यात येणाऱया तरंगत्या रंगमंचासाठी 10 कोटीची मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे असा आरोप मनसेने केला आहे. याप्रकरणात महापौरांनी मौन बाळगले असून ठाणे जिह्यातीलविद्यार्थ्यांच्या हितासाठी आयुक्तांनी दिलेल्या निधीला विरोध करणाऱया महापौरांचा मनसेने निषेध केला आहे.
ठाणे जिह्यातील विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्याचा त्रास वाचावा व ठाणेकर विद्यार्थ्यांना विद्यापिठ उपकेंद्रात नवनवीन शिक्षण पद्धतींचा अभ्यास करता यावा, चांगल्या सुविधाउपकेंद्रात मिळाव्यात या उदात्त हेतूने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वालयांनी उपकेंद्रासाठी 20 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. या निधीला ठाणेमहापौरांनी विरोध केला होता. आता संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट ने आपल्यासांस्कृतिक कार्यक्रमासाठी उपवन तलावात तरंगता रंगमंच बांधण्यासाठी 10 कोटींचीलेखी मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे. जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमावर10 कोटीची उधळपट्टी केलेली महापौरांना चालते मात्र विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्नअसलेल्या विद्यापिठाला निधी देण्यास महापौरांचा आक्षेप आहे. या अगोदरही ठाण्यातबॉलीवूड पार्क, थीम पार्क, सुगंधी झाडे इत्यादी कल्पक तसेच आकर्षक प्रकल्पांच्यानावाखाली भ्रष्टाचार झालेला आहेच त्याची पुनरावृत्ती तर होणार नाही ना याचीकाळजी घेण्यासाठी काय उपाययोजना केली आहे, असा सवाल मनविसेचे ठाणेजिल्हा अध्यक्ष संदीप पाचंगे यांनी उपस्थित केला आहे. उपवन तलावातील माशांच्या अस्तित्वाला या रंगमंचामुळे काही धोका नाही याचीखात्री केली आहे का? आयुक्त व महापौर यांच्यातील संघर्षामुळे ठाणेकरांची करमणूकहोतेच आहे. तरी मुंबई विद्यापिठ उपकेंद्रासाठी दिलेला निधी ठाणे जिह्यातीलविद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे. आधी शैक्षणिक गरजा पुर्ण करा त्यानंतरकरमणुकीसाठी नवनवीन प्रयोग करा, असा सल्लाही मनविसेचे ठाणे जिल्हाअध्यक्ष संदीप पाचंगे यांनी दिला आहे.