शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

‘जनलक्ष्मी’ची १८ लाखांची रोकड लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 2:47 AM

जनलक्ष्मी फायनान्स कंपनीची १८ लाखांची रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास शहरातील सागावमध्ये घडली.

डोंबिवली : मानपाडा रोडवरील कुंडलिक दर्शन या इमारतीमधील जनलक्ष्मी फायनान्स कंपनीची १८ लाखांची रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास शहरातील सागावमध्ये घडली. या घटनेत कंपनीचे कर्मचारी सुमित अहिरे (रा. राजेश निवास, डोंबिवली पश्चिम) हे जखमी झाले. वर्दळीच्या ठिकाणी आणि दिवसाढवळ्या ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.जनलक्ष्मी फायनान्स कंपनीची रोकड नेली जात असताना इमारतीखाली दबा धरून बसलेल्या दोघांनी अहिरे यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांनी त्यांच्याकडील बॅग हिसकावली. त्या वेळी झालेल्या झटापटीत हल्लेखोरांनी सुमितच्या हातावर धारदार शस्त्राने वार केले. त्यात सुमित खाली पडले, तेवढ्यात लुटारूंनी लाखोंची रोकड असलेली बॅग लुटून पोबारा केला. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी इमारतीनजीकच्या गल्लीतून पळ काढला. त्यामुळे ते नेमके कोणत्या दिशेला गेले, याबाबतची माहिती पोलिसांनाही मिळू शकलेली नाही.अहिरे यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत फायनान्स कंपनीने कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख व पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांचे फुटेज तपासले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.