सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी जिल्हातील सहा हजार ९७ शेतकऱ्यांचे यशस्वीरित्या आधार प्रमाणिकर झाले आहे. त्यांच्यातील बहुतांशी शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे. मंगळवार संध्याकाळपर्यंत सुमारे १७ कोटी ४६ लाख ९२ हजार रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचे ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील या कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची ठाणे जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेत १५ हजार ८०१ शेतकऱ्यांचे खाते आहे. तर इतर बँकांमध्ये ३३९ शेतकऱ्यांचे खाते आहे. या सुमारे १६ हजार १४० शेतकऱ्यांच्या बँक खात्यापैकी १२ हजार ९४१ आतापर्यंत आधार प्रमाणिकरण प्रसिध्दसाठी गाव, संस्था निहाय प्राप्त यादीमध्ये १२ हजार ९४१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले आहे. या आधार प्रमाणिकरणाच्या यादीत गावनिहाय शेतकऱ्यांचा समावेश आहे. यापैकी आतापर्यंत ५० टक्के म्हणजे सहा हजार ९७ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहेत. उर्वरित सुमारे सहा हजार ८४४ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण शिल्लक आहे.
या प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांचे दोन हजार ८२६ बँक खाते आहेत. त्यात बहुतांशी शेतकऱ्यांचे १७ कोटी ४६ लाख ९२ हजार रूपयांच्या कर्जमाफीची रक्कम जमा झाले. या कर्जमाफीच्या दृष्टीने जिल्ह्यात सुरळीत कामकाज सुरू असल्याचही जिल्हाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या दृष्टीने युध्दपातळीवर जिल्ह्यात काम सुरू आहे. त्यांच्याही बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. या कर्जमाफीच्या रकमे संबंधी काही तक्रार असल्याच ती त्वरीत जिल्हास्तरीय समन्वय समितीकडे वर्ग होत आहे. त्यावर त्वरीत निर्णय घेतला जात आहे. तर अंगठ्याचा ठसा उमटत नसलेल्या तक्रारी स्थानिक तहसीलदारांकडे जात असून त्यावर देखील त्वरीत निर्णय घेण्यात येत आहे.