कल्याण : येथील एका डॉक्टरकडे सात लाखाची खंडणी मागणा-या स्टॅनली सॅम्युअल बिजॉन याला एमएफसी पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. सात लाखांमधील दोन लाखाचा हप्ता घेताना स्टॅनलीला सहायक पोलीस निरीक्षक किरण वाघ यांच्या पथकाने अटक केली. त्याच्या आणखी एका साथीदाराचा शोध सुरू आहे.कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात डॉ. साईनाथ बैरागी यांचे उमा रूग्णालय आहे. डॉ. बैरागी यांच्याकडे स्टॅनली याने खंडणीसाठी १० आॅक्टोबरपासून तगादा लावला होता. तुमची गोपनीय माहिती आमच्याकडे असून ती आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर टाकू असे सातत्याने धमकावून सात लाखाची खंडणी मागितली जात होती. अखेर याची माहिती बैरागी यांच्याकडून स्थानिक एमएफसी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार वाघ यांनी गुरूवारी बैरागी यांच्या रूग्णालयात सापळा लावून स्टॅनलीला अटक केली. या प्रकरणी आरोपीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. रविवारी कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यात न्यायालयाने कोठडीत एक दिवसाची वाढ केल्याचे वाघ यांनी सांगितले.>खंडणीचे प्रकार वाढलेखंडणीच्या प्रकरणांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. बैरागी यांच्याकडे खंडणी मागणाºयाला बेडया ठोकल्या गेल्या असताना गँगस्टर सुरेश पुजारी याने ५० लाखाच्या खंडणीप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांनाही नुकतेच धमकावले आहे. तर काही दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही खंडणीसाठी धमकावले आहे.
डॉक्टरकडे मागितले ७ लाख रुपये, एमएफसी पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 3:00 AM