डोंबिवली : देशभरात विविध आस्थापनांचे खासगीकरण केले असताना आता आरटीओचेही खासगीकरण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. केंद्र, राज्य सरकारच्या या धोरणाचा विरोध करण्यासाठी बुधवारी ठिकठिकाणच्या आरटीओ कार्यालयांतील कर्मचारी काळ्या फिती, निदर्शने करून निषेध करणार आहेत.
आरटीओमध्ये वाहनांना जे क्रमांक दिले जायचे ते आता थेट डीलरकडून वाहन घेताना दिले जाणार असल्याने आता हळूहळू खासगीकरण सुरू झाले असल्याची चाहूल लागल्याने आरटीओ कर्मचारी निषेध करणार आहेत. कोविड काळ सुरू असल्याने आधीच नागरिकांना सेवा देण्यात विलंब झाल्याची जाण ठेवून कोणताही विभाग काम बंद करणार नाही. कर्मचारी केवळ निदर्शने करून लगेच कामाच्या ठिकाणी कार्यरत होतील, असेही मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे ठाणे विभाग अध्यक्ष सचिन तायडे म्हणाले.
--------------