शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

प्रायव्हेट बसवर कारवाई करण्यासाठी आरटीओला वेळ मिळेना, वाहतुक पोलिसांनी केले आरटीओला टारगेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 5:13 PM

खाजगी बसेवर वारंवार कारवाई होऊनही या बसेसचा वेग आणखीनच सुसाट होऊ लागला आहे. ठाणे परिवहन प्रशासनाने या बसेसवर कारवाई करण्यासाठी आरटीओला टारगेट केल्यानंतर आता वाहतुक पोलिसांनी देखील आरटीओकडेच बोट दाखविले आहे.

ठळक मुद्देखाजगी बसेसवर आरटीओ कारवाई करणार का?परिवहनच्या थांब्यावर बसेसचा वावर

ठाणे : ठाणे पूर्वेतून सुटणाऱ्या  खाजगी बसच्या विरोधात कोपरीत आंदोलन झाल्यानंतरही आजही त्यांचा प्रवास सुसाट सुरू आहे. महापालिकेने त्यांच्यावर कारवाईसाठी आरटीओकडे बोट दाखविले असतांना आता वाहतूक पोलिसांनीदेखील आरटीओलाच जबाबदार धरले आहे. असे असले तरी या बसना लगाम कोण घालणार असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित झाला आहे.मागील सहा महिन्यांपूर्वीदेखील समितीने कोपरी येथून होणाऱ्या खाजगी बसच्या विरोधात आंदोलन उभारले होते. त्यानंतर त्या काही दिवसांसाठी का होईना बंद झाल्या होत्या. त्यानंतर वाहतूक पोलीस आणि संबंधीत आरटीओ प्रशासनानेदेखील यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आज आठ महिने उलटून गेल्यानंतरही त्या विरोधात कोणतीच कारवाई झालेली नाही. कोपरीमध्ये आंदोलन झाल्यानंतर या बस बंद होतील असे वाटत होते. परंतु, आजही त्या सुसाट सुरूच आहेत. टीएमटीच्या बस थांब्यावर त्या उभ्या करू नका म्हणून परिवहनतर्फे कर्मचारी नेमले आहेत. परंतु, त्यांच्याशी हुज्जत घालून त्या थेट बसथांब्यावर उभ्या राहत आहेत. कॅडबरी ब्रीज, नितीन कंपनी आणि तीनहातनाक्याजवळील ब्रीजच्या चढणीवर आणि उताराला रस्त्याच्या मधोमध त्या उभ्या केल्या जात आहे. अचानक त्या उभ्या राहत असल्याने अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. हायवेला सर्वच वाहने सुसाट असतात, परंतु अशा पद्धतीने कुठेही कसेही प्रवासी घेणे आणि उतरविणे यामुळे इतर वाहन चालकांबरोबर प्रवाशांचा जीवदेखील धोक्यात घालण्याचा प्रकार त्यांच्याकडून होत आहे.दरम्यान, या बसेसवर कारवाई व्हावी म्हणून परिवहनच्या बैठकीत देखील चर्चा झाली होती. परंतु,आरटीओकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देऊन परिवहन प्रशासनाने त्यांच्यावर कारवाईचे अधिकारही त्यांनाच असल्याचे सांगितले होते. दुसरीकडे आता या संदर्भात ठाणे वाहतूक पोलिसांशी चर्चा केली असता, त्यांनीदेखील या बसवर कारवाईचे अधिकार हे आरटीओला असल्याचे साांगितले आहे. आम्ही त्यांच्यासमवेत कारवाईला तयार आहोत, तसे पत्रव्यवहारदेखील आरटीओला केला आहे. परंतु,त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आरटीओ आता कारवाईसाठी कोणाची वाट बघत आहे, हे पहाणे महत्त्वाचे ठरले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाRto officeआरटीओ ऑफीस