बोर्डी: महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने परराज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक केले आहे.
दरम्यान शनिवार, 15 मेच्या सकाळी सात वाजेपासून महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यातील अच्छाड येथे गुजरात तसेच दमन आणि दादरा नगर हवेली या राज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांची पालघर तपासणी केली जात आहे. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अच्छाड येथे तपासणी नाका उभारण्यात आला असून या ठिकाणी सर्व प्रवाशांचे आरटीपीसीआर प्रमाणपत्र तपासली जात आहेत . ज्यांच्याकडे या चाचणीचा अहवाल नाही, त्यांना पुन्हा माघारी पाठवण्यात येत आहे. या तपासणी नाक्यांमुळे मुंबई कडे येणाऱ्या वाहिनीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत . तसच अवजड वाहन चालक चालक आणि वाहक यांच्या कडे अहवाल नसल्याने बहुतांशी अवजड वाहने ही माघारी पाठवली जात आहेत.