शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महिलांशी असभ्य वर्तन : अधिकाऱ्यांच्या केबिनला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 3:35 AM

मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.ई.ए. हश्मी हे महिला सदस्यांशी असभ्य वर्तणूक करतात.मासिक सभेला अनुपस्थित राहतात. कर्मचा-यांना भरसभेत शिवीगाळ करून ऊठबशा काढायला लावतात.

मुरबाड -  मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.ई.ए. हश्मी हे महिला सदस्यांशी असभ्य वर्तणूक करतात.मासिक सभेला अनुपस्थित राहतात. कर्मचा-यांना भरसभेत शिवीगाळ करून ऊठबशा काढायला लावतात. त्यांच्या बदलीसाठी शुक्रवारी सभापती, उपसभापती, सदस्य, भाजपा तालुकाध्यक्ष, मुरबाड शहराध्यक्ष यांनी गटविकास अधिकाºयांच्या केबिनला टाळे ठोकून निषेध नोंदवला. दरम्यान, असभ्य वर्तनासंबंधातील आरोपाबाबत हश्मी यांनी बोलण्यास नकार दिला.मुरबाड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हश्मी हे पंचायत समिती सदस्यांना तसेच तालुक्यातून येणाºया नागरिकांना कामात सहकार्य करत नाहीत. विकासकामात अडथळा आणून वेळेवर बिले दिली जात नाहीत. पंचायत समितीच्या महिला सदस्यांशी असभ्य वर्तणूक करतात.पंचायत समितीतील महिला कर्मचाºयांना मीटिंगमध्ये सर्वांसमक्ष शिवीगाळ करतात. त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. सभापती-उपसभापतींनाही कामात सहकार्य करत नाहीत. असा मनमानी कारभार असल्याने हा गटविकास अधिकारी बदलून त्यांच्याजागी तत्काळ दुसरा अधिकारी द्यावा, या मागणीसाठी सभापती जनार्दन पादीर, उपसभापती सीमा घरत, सदस्य श्रीकांत धुमाळ, चंद्रकांत सासे, प्रतिभा खापरे, स्नेहा धनगर, जया वाघ, अरु णा खाकर, तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, शहराध्यक्ष रूपेश गुजरे आणि भाजपाच्या अन्य कार्यकर्त्यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांना निवेदन दिले आहे.गटविकास अधिकारी हश्मी यांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि त्यांचे असभ्य वर्तन रोखण्यासाठी सभापतीसह सदस्यांनी त्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कामात असहकार्य करत असणा-या गटविकास अधिका-याला त्याच्या केबिनमध्ये जाऊ देणार नाही. जोपर्यंत आम्हाला दुसरा अधिकारी मिळत नाही, तोवर आम्ही केबिन उघडू देणार नाही.- जनार्दन पादीर, सभापती, पंचायत समिती, मुरबाडआम्हा महिला सदस्यांना असभ्य वर्तन करून बोलणे, विचित्र हावभाव करणे, महिला कर्मचाºयांना शिवीगाळ करणे, असे गटविकास अधिकाºयाचे विक्षिप्त वागणे आहे. महिलांचा सन्मान न राखणारा असा अधिकारी आम्हाला नको.- सीमा घरत, उपसभापती,पं.स. मुरबाडसत्ताधारी भाजपाची पंचायत समितीमध्ये सत्ता असूनही सभापती आणि सत्ताधारी सदस्यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांची केबिन बंद करून कामकाज बंद करणे, हे लोकशाहीच्या विरोधात आहे.- बाळाराम सूर्यराव, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे जिल्हागटविकास अधिकाºयांची केबिन बेकायदेशीर बंद करणे, हे अनुचित आहे. ज्यांनी केबिनला टाळे ठोकले, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.- विवेक भीमनवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणेमुरबाड पंचायत समितीमधील घरकुले आणि शौचालयाची बिले प्रलंबित आहेत. मात्र, त्याची शहानिशा आणि तपासणी केल्याशिवाय मंजूर करणे शक्य नसल्याचे सांगत प्रत्यक्ष पाहणी करणे म्हणजे मनमानी नाही.- एस.ई.ए. हश्मी, गटविकास अधिकारी, मुरबाड

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या