कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात आधुनिक आरोग्य सेवा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
साळवी यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रुक्मिणीबाई रुग्णालयातील एक्सरे मशीन सुरू नाही. रुग्णांना विविध चाचण्या करण्यासाठी बाहेरच्या लॅबचा आधार घ्यावा लागतो. तसेच सोनोग्राफी आणि रक्त चाचण्या केल्या जात नाहीत. महाग औषधे बाहेरच्या मेडिकल दुकानातून आणण्यास सांगितली जातात, अशा रुग्णांच्या अनेक तक्रारी आहेत. महापालिका हे रुग्णालय चालविण्यावर कोट्यवधी रुपये वर्षाला खर्च करते. मात्र रुग्णांना योग्य आरोग्य सेवा मिळत नसेल तर हा खर्च वाया जातो, याकडे साळवी यांनी लक्ष वेधले. महापालिकेची रुग्णालये ही सामान्यांच्या आरोग्याचा आधार असताे. त्यांना त्या ठिकाणी उपचार मिळत नसतील तर ही गंबीर बाब आहे. रुक्मिणीबाई रुग्णालयात आसपासच्या शहरातील लोकही उपचारासाठी येतात. त्या ठिकाणी विविध सुसज्ज आरोग्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात नक्की विचार केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी शिंदे यांना दिले.
-----------------
वाचली