शशी करपे लोकमत न्यूज नेटवर्कवसई : सध्या सुुरु असलेल्या रुटसह सर्वच रुटवर बस सेवा चालवू असे प्रतिज्ञापत्र मुंबई हायकोर्टात सादर करून एसटी महामंडळाने एक तर सर्वच मार्गावर बस सेवा सुरु करा अन्यथा सगळेच मार्ग आम्हाला द्या, असेच वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाला अप्रत्यक्षरित्या सुनावले. त्यामुळे फक्त फायद्याचेच रुट मागणाऱ्या परिवहन विभागाची कोंडी झाली आहे.एसटी महामंडळाने राज्य सरकारच्या निर्णयानुसार शहरी मार्गावरील बससेवा बंद करून महापालिकेच्या परिवहन सेवेला दिल्या आहेत. मात्र, परिवहन विभागाने फायद्याचे मार्गावरच बससेवा सुरु करून वसई आणि नालासोपारा डेपोतून ग्रामीण भागात सुटणाऱ्या रुटवर बस सेवा सुरु करण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. गाड्या उभ्या करण्यासाठी आणि प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा नसल्याने वसई आणि नालासोपारा डेपोतून उर्वरित २१ रुटवर बससेवा सुरु करण्यास असमर्थ असल्याचे कारण पुढे करीत महापालिकेने जवळपास दहा महिन्यांपासून बस सेवा सुरु करण्याचे टाळले आहे. एसटी महामंडळाने तीनवेळा या रुटवरील बससेवा बंद केल्या होत्या. त्यामुळे आंदोलनही झाले होते. शेवटी डॉमणिका डाबरे आणि एक विद्यार्थी शयरन डाबरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाने अंतिम निर्णय होईपर्यंत बससेवा सुरु ठेवण्याचेआदेश एसटीला दिले आहेत. दरम्यान, परिवहन विभाग जागेसाठी अडून बसले आहे. तर एसटी महामंडळ जागा न देण्यावर ठाम आहे. त्यामुळे हा वाद मिटत नसल्याने परिवहन विभाग बससेवा सुरु करीत नाही. आता २२ जून २०१७ रोजी हायकोर्टात याप्रकरणी सुनावणी झाली महामंडळाने आपल्या प्रतिज्ञापत्रात सध्या फायद्यात असलेले वसई-ठाणे-मुलुंड, वसई-नवघर, नवघर पूर्व-सातीवली, नवघर पूर्व-वसई-हायवे फाटा, अर्नाळा-विरार, अर्नाळा-विरार-हायवे आणि नालासोपारा-हायवे फाटा या रुटवर बस चालवण्यास तयार असल्याचेही नमूद केले आहे. या रूटवर सध्या परिवहनच्या बसेस धावत आहेत.
वसईतील सर्वच मार्गावर बसेस चालवू
By admin | Published: June 23, 2017 5:08 AM